माहिती अधिकार फेडरेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लूतफल्लाह सिद्दीकी यांचा सत्कार संपन्न
परळी प्रतिनिधी. माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लूतफल्लाह रफातुल्लाह सिद्दीकी यांचा परळी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आयुब खान पठाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी एका
पत्रकाद्वारे लूतफल्लाह रफातुल्लाह सिद्दीकी यांची माहिती अधिकार फेडरेशनच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली आहे.याबाबत अधिकृत नियुक्ती पत्र सिद्दीकी यांना देण्यात आले आहे.माहिती अधिकार कायदा 2005 चा प्रचार व प्रसार करावा व जनजागृती व्हावी हा उद्देश या निवडीमागे आहे.

बीड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर लूतफल्लाह रफातुल्लाह सिद्दीकी यांचा परळी नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अय्युब खान पठाण यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा