उड्डाण पूलावरील तुटलेली भिंत आणि बांधकाम विभागाचा नेहमीचाच अक्षम्य दुर्लक्षपणा बांधकाम विभाग आणखी एका अपघाताची वाट पाहत आहे?

उड्डाण पूलावरील तुटलेली भिंत  आणि बांधकाम विभागाचा नेहमीचाच अक्षम्य दुर्लक्षपणा 


बांधकाम विभाग आणखी एका अपघाताची वाट पाहत आहे?


परळी प्रतिनिधी.      परळी शहरातील अत्यंत महत्वाचा असलेला रेल्वे उड्डाणपूलावरील पोलीस चौकीच्या बाजूला असलेली सुरक्षा भिंत काही वर्षांपूर्वी एका अपघातात तुटलेली आहे.परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नेहमीच्याच अक्षम्य दुर्लक्षपणामुळे कठड्याचे बांधकाम अद्याप करण्यात आलेले नाही.
     उड्डाण पूलावर रहदारीच्या व्यवस्थेसाठी जी पोलीस चौकी उभारण्यात आली होती.ती सध्या बंद अवस्थेत आहे.या चौकीच्या बाजूला बस स्थानककाकडे जाणा-या उतारावर तीन ते चार वर्षीपूर्वी एका ट्रकने संरक्षीत भिंतीला जोराची धडक दिली होती.या धडकेत सदरील भिंतीचा बराचसा भाग कोसळला होता.जो आज धोकादायक बनलेला आहे.याच तुटलेल्या भिंत,
कठड्याला खेटून दररोज हजारो वाहने जात असतात.त्यामुळे कधीही हा तुटलेला भाग मोठ्या अपघाताचे कारण ठरू शकतो.
    सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभाग परळी तसेच कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,अंबाजोगाईचे अधिकारी याच ठिकाणी दुसऱ्या अपघाताची वाट पाहत आहेत का असा सवाल निर्माण झाला आहे.नागरिकांची व वाहनधारकांची सुरक्षा लक्षात घेता या तुटलेल्या भिंतीची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने