विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी झटणाऱ्या शिक्षकाच्या आत्महत्येस जबाबदार कोण
तीन वर्षांच्या श्रावणीस लिहिले भावनिक पत्र , आणखी शासन किती शिक्षकांचा बळी जाऊ देणार
परळी / केज. : गेली 18 वर्ष विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी झटणाऱ्या शिक्षकाने स्वतःचे भविष्य अंधकारमय दिसल्यानंतर आपल्या तीन वर्षांच्या निरागास श्रावणी बाळाला भावनिक पत्र लिहून आत्महत्या केली आहे.या आत्महत्येमुळे विनाअनुदानित शाळांवर काम करणाऱ्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडे सरकार आता तरी लक्ष देणार का? आणखी किती शिक्षकांचा बळी जाऊ देणार असा संवाल निर्माण झाला आहे.या मृत्यूस जबाबदार कोण.दरम्यान कुटुंबीयांनी पोलिसांकडे इन कॅमेरा पोस्ट मार्टम करण्याची मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,केळगाव येथील आश्रम शाळेत विनाअनुदानीत पदावर शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकाने शनिवारी सकाळी बीड शहरातील कृष्णा बँकेच्या दारातच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.केज तालुक्यातील केळगाव येथील धनंजय अभिमान नागरगोजे राहणार.देवगाव ता.केज हा कायम विनाअनुदानित आश्रम शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता.सदरील शिक्षक हा गेल्या अनेक वर्षांपासून विना अनुदान तत्वावर कार्यरत होता . सरकारने २०१९ साली २०
टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती . मात्र ते अनुदान सुरू झाले नाही .
टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती . मात्र ते अनुदान सुरू झाले नाही .
गेल्या अनेक वर्षांपासून अनुदान नसतानाही विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणार्या शिक्षकाने अखेर आपली जीवनयात्रा संपवली . सकाळी स्वराज्य नगर येथे घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी सदर शिक्षकाने त्यांच्या फेसबुकवर पोष्ट टाकली होती.त्यामध्ये आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या काही जणांची नावे असल्याचे समजते. नातेवाईकांनी पोलिसांकडे इन कॅमेरा पंचनामा करण्याची मागणी केली आहे.आता पोलीस यावर काय कारवाई करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा