डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. उमाकांत राठोड यांची संभाजीनगर पोलिसांकडून मुस्कटदाबी हा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला - प्रा. उमाकांत राठोड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. उमाकांत राठोड यांची संभाजीनगर पोलिसांकडून मुस्कटदाबी 

हा तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला - प्रा. उमाकांत राठोड 

औरंगाबाद (प्रतिनिधी. )      डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अर्थसंकल्पीय बैठक उद्या दिनांक 15 मार्च रोजी होत असून या बैठकीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या वतीने सिनेट सदस्य प्रा. उमाकांत राठोड यांना भारतीय न्याय संहिता कलम 168 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे  सिनेट सदस्य प्रा. डॉ .उमाकांत राठोड यांनी म्हटले आहे. आता विद्यापीठाच्या अथवा एखाद्या सभागृहाच्या बैठकीत काय बोलावे आणि काय बोलू नये हे पोलीस ठरविणार का? असा संवा
ल निर्माण होत आहे. 
    याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 15 मार्च 2025 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची आधीसभा प्राधिकरणाची अर्थसंकल्पीय बैठक विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील महात्मा फुले सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सिनेट सदस्य म्हणून प्रा. उमाकांत राठोड हे उपस्थित राहणार आहेत. 
   प्रा. उमाकांत राठोड यांनी विद्यापीठास काही प्रश्नांची उत्तरे मागितले आहेत. परंतु सदर उत्तरे समाधानकारक दिली नसल्याचे राठोड यांचे मत आहे. दरम्यान छत्रपती संभाजी नगर, बेगमपुरा पोलीस स्टेशन शहर यांनी प्रा .राठोड यांना कलम 168 ची नोटीस बजावली आहे व या नोटीसद्वारे  बैठकीत काही अनुचित प्रकार झाल्यास तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणा विरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. 
    छत्रपती संभाजी नगर बेगमपुरा पोलीस स्टेशनची ही एक प्रकारे उमाकांत राठोड यांची मुस्कटदाबी असल्याचे बोलले जात आहे. तसेच सरळ सरळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. मला सभागृहामध्ये माझे मत मांडण्याचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार असल्याचे प्रा. उमाकांत राठोड यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने