फाल्गुन पौर्णिमेनिमित्त 16 मार्च रोजी जवळा फकीर येथे धम्मदेसना - भदंत पय्यातीस महाथेरो
परळी प्रतिनिधी. बौद्ध धम्मात फाल्गुन पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. त्या निमित्ताने 16 मार्च रोजी जवळा येथील मृगदायवन महाविहारात धम्मदेसना व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भदंत पय्यातीस महाथेरो यांनी दिली आहे.
16 मार्च रोजी मृगदायवन महाविहार, धम्म प्रशिक्षण संस्था,सारनाथ पार्क,जवळा फकीर येथे दुपारी 12.30 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात भदंत पय्यातीस महाथेरो व भदंत मुदितानंद थेरो,परभणी यांचे धम्मदेशना होणार आ
हे. या कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड, बीड येथील सेवानिवृत्त तहसीलदार आर. आर .गायकवाड, माजलगाव येथील शामराव वाघमारे आणि अहमदपूर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वाघमारे उपस्थित राहणार आहेत.

लवकरच मृगदायवन महाविहारात भिक्खू निवास, व विपश्यना धम्म हॉलचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे बौद्ध बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन भदंत पय्यातीस महाथेरो यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा