प्रा. विक्रम धन्वे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान
परळी प्रतिनिधी. तालुक्यातील सिरसाळा येथील श्री.पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्रा. विक्रम धन्वे यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. प्रा.विक्रम धन्वे हे फुले, शाहू,आंबेडकरी चळवळीतील एक अभ्यासू विचारवंत म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
प्रा. विक्रम धन्वे यांनी चित्रपट अभ्यास : ( विल्यम्स शेक्सपिअरच्या निवडक शोकांतिकांची बॉलीवूड आवृत्ती) या विषयावर आपला शोध प्रबंध डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास सादर केला होता. त्यांच्या या शोध प्रबंधास विद्यापीठाने त्यांचा पीएच.डी. पदवी देऊन गौरव केला आहे. त्यांना संशोधक मार्गदर्शक म्हणून प्रोफेसर डॉ. आर. टी. बेद्रे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. विक्रम धन्वे यांना मिळालेल्या पीएच.डी. बद्दल रामेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव कदम, सचिव योगेश प्रिया कदम, संचालक डॉ. गणपत गट्टी
,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.के. पाटील, प्रोफेसर डॉ.प्रा. डॉ.के .एम. नागरगोजे, प्रा. दयानंद झिंजुर्डे, प्रा. डॉ.बालाजी साबळे ,आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ रामदादा किरवले, प्रमोद किरवले,सुभाष चोपडे, एडवोकेट दिलीप उजगरे, ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक रानबा गायकवाड प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ तायडे कवी बा.सो. कांबळे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा