महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास मुस्लिम समाजाचा पाठिंबा, परळीत निघाला भव्य शांती मार्च

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास मुस्लिम समाजाचा पाठिंबा, परळीत निघाला भव्य शांती मार्च 

परळी ( रानबा गायकवाड )  जगाला शांतीचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्ती झाली. त्या बिहार राज्यातील बुद्ध गया येथे असणारे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या व इतर प्रमुख मागणीसाठी होणाऱ्या  आंदोलनास तमाम मुस्लिम समाजाचा पाठिंबा असल्याचे मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मौलाना मुफ्ती अशफाक कासमी यांनी पाठिंबा देतांना सांगितले. या मागणीसाठी परळी शहरात दिनांक 17 मार्च रोजी बौध्दजन संघर्ष समितीच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर भव्य शांती मार्च काढण्यात आला. 
     परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर येथून 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता भदंत पय्यातीस महाथेरो व भदंत मोगलाय्यन यांच्या प्रमुख उपस्थितीत शांती मार्चला सुरुवात
करण्यात आली. बी टी अॅक्ट 1949 रद्द करावा, बौद्धगया महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे आदी प्रमुख मागण्याचे फलक मोर्चात सहभागी झालेल्या महिला व पुरुषांच्या हातात दिसत होते. तसेच पंचशील ध्वजाने संपूर्ण शांती मार्च बौद्धमय झाला होता. 
   हा शांती मार्च राणी लक्ष्मीबाई टॉवर , सोनार लाईन मोंढा मार्केट, स्टेशन रोड ,बस स्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, भगवान बाबा चौक या मार्गे तहसील कार्यालयावर येऊन पोहोचला. त्यानंतर उपस्थित सर्व बौद्ध अनुयायांना भदंत पय्यातीस महाथेरो यांनी संबोधित केले. व केंद्र सरकारने महाबोधी महाविहार लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली. राष्ट्रपतींना देण्यात येणारे मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार परवेज पठाण मॅडम यांनी स्विकारले.
    याप्रसंगी मुस्लिम समाजाच्या वतीने मुस्लिम धर्मगुरू मौलाना मुफ्ती अशफाक कासमी यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास तमाम मुस्लिम समाजाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच या लढ्यात मुस्लिम समाजही सहभागी असल्याचे सांगितले.या शांती मार्चमध्ये बौद्धजन संघर्ष समितीचे भास्कर नाना रोडे, प्रा.दासू वाघमारे, प्रा. विलास रोडे, माधवराव ताटे, वैजनाथराव जगतकर, एच.टी. वाघमारे, अनंत इंगळे, रवी मुळे, दशरथ शिंदे ,देवानंद वाघमारे, डॉक्टर सिद्धार्थ जगतकर, महादू सरवदे सर, अशोक वाघमारे ,एच. आर. वाघमारे,बाबासाहेब पाचंगे, पंडितराव झिंजुर्डे ,दीपक सिरसाट, मुक्ताराम गवळी, शैलेंद्र पोटभरे, आनिता रोडे, गवळणबाई गोखले, उबाळे ताई, सोजरबाई ताटे, द्वारका रोडे, रंजना मस्के, सविता सरवदे, मैनाताई होके, गवळणबाई वाघमारे, कल्पनाताई गवळी, सुनंदा साळवे, सुनिता किवंडे आदी महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने