मिलिंद नगर येथील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे,? नागरिकांत असंतोष

मिलिंद नगर येथील सिमेंट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे,? नागरिकांत असंतोष 

परळी (प्रतिनिधी)       शहरातील मिलिंद नगर येथे होत असलेल्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे.दरम्यान या रस्त्यावर केलेले सिमेंट काँक्रिटीकरण किती दिवस टिकेल हा सवाल निर्माण झाला आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील मिलिंद नगर येथे बौद्ध विहार ते पुढे रेल्वे हद्दी पर्यंत रस्ता आहे.या रस्त्यावर काल सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले.परंतू हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.रस्त्यावर काही ठिकाणी दोन इंच, तीन इंच तर काही ठिकाणी चार ईंच जाडीचा माल टा
कलेला आहे.त्यातही सिमेंट कमी वापरल्याचे दिसत आहे.माल टाकल्यानंतर काही तासांतच रस्त्यावर भेगा पडलेल्या दिसत आहेत.
    दरम्यान अशा प्रकारचा तयार करण्यात आलेला रस्ता किती दिवस टिकेल हे गौडबंगाल आहे.येणा-या पावसाळ्यात रस्ता उखडून जाण्याची दाट शक्यता आहे. रस्ता पूर्ण होण्या अगोदर नगर परिषदेचे बांधकाम अभियंता ढवळे यांनी संबंधित गुत्तेदारास व नागरिकांना उत्कृष्ट काम झाल्याचे सांगितले असल्याचे समजते.तरी या कामाकडे नगर परिषद प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने