लोकमत कॅम्पस क्लब चित्रकला स्पर्धेत रसिका तायडे प्रथम
परभणी ( प्रतिनिधी) येथील लोकमत कॅम्पस क्लबच्या वतीने ओयासिस इंग्लिश स्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत ओयासिस इंग्लिश स्कूलची इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कु. रसिका सविता सिद्धार्थ तायडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. शहरातील ओयासिस इंग्लिश स्कूल आणि ओयासिस विद्यालयातील एकूण २१०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन चित्रकला स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक एस.आय.पी. अबॅकसचे प्रमुख अमोल जोशी, पर्यवेक्षक सिद्धार्थ नागठाणकर, विश्वभर काठवटे, प्राचार्य महेंद्र मोताफळे, किरण रोपळेकर आणि कृष्णा निकम यांच्या हस्ते संपन्न झाले. नर्सरी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या प्रत्येक वर्गातून दोन उत्कृष्ट स्पर्धकांची निवड करून त्यांना विजेते घोषित करण्यात आले.ओयासिस इंग्लिश स्कूलमधील विजेते विद्यार्थी असे: नर्सरी - प्रथम श्रीजा बुचाटे, द्वितीय विक्रमादित्य डाके; ज्युनिअर के. जी. - प्रथम संग्राम धरणे, द्वितीय शिवकन्या भोसले; सिनियर के. जी. - प्रथम शिवांश ढोणे, द्वितीय अनया चव्हाण; इयत्ता पहिली - प्रथम पल्लवी भोसले, द्वितीय श्रेयश पांचाळ; दुसरी - प्रथम विहान संबरक
र, द्वितीय रिया पारे; तिसरी - प्रथम रसिका तायडे, द्वितीय यश गोरे; चौथी - प्रथम प्रांजल गरुड, द्वितीय देवांश लहाने; पाचवी - प्रथम सांची मानवते, द्वितीय रोहित जाधव; सहावी - प्रथम प्रज्ञेश आर्वीकर, द्वितीय शाल्मली तळेकर; सातवी - प्रथम साईराज डोंबे, द्वितीय हिंदवी वन्हाडे; आठवी - प्रथम अनया दांडे, द्वितीय प्रथमेश गरुड.
र, द्वितीय रिया पारे; तिसरी - प्रथम रसिका तायडे, द्वितीय यश गोरे; चौथी - प्रथम प्रांजल गरुड, द्वितीय देवांश लहाने; पाचवी - प्रथम सांची मानवते, द्वितीय रोहित जाधव; सहावी - प्रथम प्रज्ञेश आर्वीकर, द्वितीय शाल्मली तळेकर; सातवी - प्रथम साईराज डोंबे, द्वितीय हिंदवी वन्हाडे; आठवी - प्रथम अनया दांडे, द्वितीय प्रथमेश गरुड.
ओयासिस विद्यालयातील विजेते विद्यार्थी: नर्सरी - प्रथम काव्या ढगे, द्वितीय युवराज दळवी; ज्युनिअर के. जी. - प्रथम सृष्टी गिरी, द्वितीय रोहन मोरे; सिनियर के. जी. - प्रथम प्रथमेश राजुरे, द्वितीय स्वराली कोकडे; पहिली - प्रथम आयुष राठोड, द्वितीय अभिरा कांबळे; दुसरी - प्रथम अर्णव बोबडे, द्वितीय सृष्टी कन्हाळे; तिसरी - प्रथम अभिलाषा सोनवणे, द्वितीय स्वराज तळेकर; चौथी - प्रथम सम्मेद लावंडे, द्वितीय अदिती जमशेटे; पाचवी - प्रथम स्नेहा सोनटक्के, द्वितीय पार्थ कदम; सहावी - प्रथम वरद तांदळे, द्वितीय सई सरदेशपांडे; सातवी - प्रथम निधी पवार, द्वितीय हर्षल जाधव; आठवी - प्रथम श्रावणी ढगे, द्वितीय समृद्धी यादव.
दासगणू नगरमधील ओयासिस इंग्लिश स्कूलमधील विजेते: नर्सरी - प्रथम तन्वी नरवाडे, द्वितीय मल्हारीकांत विभुते; ज्युनिअर के.जी. - प्रथम शुभन टोमके, द्वितीय अनन्या पुंड; सिनियर के.जी. - प्रथम अधिराज कछवे, द्वितीय अदिती बडगुजर.स्पर्धेच्या समारोपानंतर प्रमुख प्रायोजकांच्या हस्ते सर्व विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ओयासिस इंग्लिश स्कूल आणि ओयासिस विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले
प्रथम क्रमांक विजेती कु. रसिका तायडे ही प्रख्यात सिने-नाट्य लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे आणि विधीज्ञ सविता वाव्हळ- तायडे यांची सुकन्या आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा