महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या
उद्या माजलगाव येथे एकदिवसीय धरणे आंदोलन
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
माजलगाव प्रतिनिधी. बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी देश विदेशातील बौद्ध भिक्खूनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी उद्या दिनांक 11 मार्च रोजी माजलगाव येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन पुकारण्यात आले असून या आंदोलनात बौद्ध बांधवांनी व आंबेडकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी माजलगाव तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 ते 5 या वेळेत होणा-या या आंदोलनाचे नेतृत्व भन्ते शरणानंद महाथेरो,भन्ते पय्यातीस महाथेरो, भदंत पिंडोल महाथेरो आणि भन्ते मुदितानंद थेरो हे करणार आहेत.जगातील सर्व बौद्ध धर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापन समिती संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावी,बी टी.कायदा 1949 रद्द क
रावा आदि प्रमुख मागण्यासाठी गेल्या दहा दिवसापासून महाबोधी महाविहार बुद्ध गया येथे बौद्ध भिक्खू आंदोलन करीत आहेत.या आंदोलनाला देश विदेशातून पाठिंबा मिळत आहे.
रावा आदि प्रमुख मागण्यासाठी गेल्या दहा दिवसापासून महाबोधी महाविहार बुद्ध गया येथे बौद्ध भिक्खू आंदोलन करीत आहेत.या आंदोलनाला देश विदेशातून पाठिंबा मिळत आहे.
महाराष्ट्रात सुध्दा अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत.याच पार्श्वभूमीवर माजलगाव येथे होणारे आंदोलन महत्वाचे ठरणार आहे.या धरणे आंदोलनात शुभ्र वस्त्र परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा