डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
11 एप्रिल रोजी विद्यार्थी प्रबोधन मेळावा - रानबा गायकवाड
परळी प्रतिनिधी. महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त दैनिक सम्राट व परळी बुलेटीनच्या वतीने विद्यार्थी प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भीमयुगकार जेष्ठ पत्रकार व साहित्यिक रानबा गायकवाड यांनी दिली आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून ओळखले जातात.तसेच देशातील तमाम विद्यार्थ्यां
साठी एक आदर्श आहेत.प्रेरणास्थान आहेत.बाबासाहेबांनी जी क्रांती केली त्यामध्ये त्यांचे शिक्षण आणि विद्वत्ता होती.आज आंबेडकरी समाजातील विद्यार्थ्यांच्या समोर असणारे प्रश्न, समस्या, बेरोजगारी,वाचनाची आवड निर्माण करणे आदी विषयांवर या मेळाव्यात मान्यवरांच्या मार्गदर्शन लाभणार आहे.

11 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शहरातील पत्रकार भवन येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे रानबा गायकवाड यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा