अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने महाशिवरात्री निमित्त
भाविकांना खिचडी वाटप
परळी प्रतिनिधी. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ प्रभू मंदिराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला आलेल्या भाविकांना अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने खिचडी वाटप करण्यात आली.
महाशिवरात्री निमित्त अल्ट्राटेक सिमेंटच्या वतीने मंदिर परिसरात खिचडी स्टाल लावण्यात आला होता.या वेळी बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांना खिचडी वाटप करण्यात आली.याप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश सिंग,कुलदीप खोब्रागडे, बाबासाहेब चिकाटे, विवेकानंद शिंदे, रोशन कोकुलवार,राघु घनघाव, बालासाहेब मुंडे,अन्वर भैय्या आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा