छत्रपती शिवरायांबद्दल विषारी गरळ ओकणा-या प्रशांत कोरटकरला परळीत जोडो मारो आंदोलन
परळी प्रतिनिधी. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल विषारी गरळ ओकणा-या जातीयवादी प्रशांत कोरटकरच्या विरोधात परळीत जोरदार निदर्शने करण्यात आली. त्याच्या प्रतिमेस आंदोलकांनी जोडे मारून त्याचा जाहीर निषेध केला व राज्य सरकारने कोरडकरवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्याशी मोबाईल वरून बोलत असताना जातीयवादी प्रवृत्तीच्या प्रशांत कोरडकर याने महाराष्ट्राची अस्मिता असलेले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अतिशय अपमानास्पद वक्तव्य केली या वक्तव्याचा महाराष्ट्र सह देशभर सर्वत्र निषेध होत आहे तसेच कोरडकरच्या विरोधात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत.
परळी वैजनाथ येथे आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शिवप्रेमी तसेच आंबेडकर प्रेमी नागरिकांच्या वतीने सकाळी 11 वाजता राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे जातीवादी प्रशांत कोरडकर च्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली तसेच त्याच्या प्रतिमेला आंदोलकांनी चप्पल व बुट मारून जाहीर निषेध केला तसेच राज्य सरकारने अशा प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे अशा प्रकारची मागणी केली व फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र महापुरुषांचा अपमान कदापिही सहन करणार नाही असा कडक इशारा यावेळी दिला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते उत्तम माने, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते लुगडे महाराज, सामाजिक कार्यकर्ते अनंत इंगळे, ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते बाबा शिंदे,नितीन राव शिंदे, शिवाजीराव देशमुख, बालाजी काळे, मनसेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर , प्राचार्य प्रा. अतुल दुबे,शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, दिनेशजी गजमल,केशव साबळे पाटील, एकतावादी रिपाईचे शहराध्यक्ष सुनील कांबळे, केशवराव मुंडे, भागवत साबळे, ज्येष्ठ नेते मुक्ताराम गवळी, महबूब कुरेशी, हरिभाऊ बुरकुले, पत्रकार निवृत्ती खाटीक, हनुमंत माने, भगवानराव काकडे आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा