महाशिवरात्री निमित्त थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर्स असोसिएशनच्या वतीने 10 क्विंटल खिचडी वाटप

महाशिवरात्री निमित्त थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर्स असोसिएशनच्या वतीने 10 क्विंटल खिचडी वाटप

परळी  (प्रतिनिधी):- देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील पाचवे प्रभू वैजनाथ ज्योतिर्लिंग येथे महाशिवरात्रीनिमित्त परळी नगरीत दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनच्या वतीने तब्बल विक्रमी 10 क्विंटल शाबुदाणा खिचडी वाटप करण्यात आली. परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांच्या शुभहस्ते दि २६ रोजी सकाळी प्रसाद वाटप सुरू करण्यात आले. प्रसादाचा भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
       महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी परळी थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनच्या वतीने गेल्या गेल्या 17  वर्षापासून शाबुदाणा खिचडी वाटप केली जाते .आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी वैद्यनाथ मंदिराच्या परिसरामध्ये तब्बल विक्रमी 10 क्विंटल एवढ्या मोठ्या प्रमाणात  भाविकांना खिचडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. 
   यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभाऊ हाडबे, शेखर स्वामी, शिवाजी बिडगर,जयंती भाई पटेल, महादेव इटके, राजन, बंडू गित्ते, गोपाळ मुंडे, मधुकर नाईकवाडे, हरिभाऊ बुरकुले, टी
 जे. मुंडे, दशरथ गित्ते, सायस मुंडे, कैलास तोतला, विवेक अवस्थी, दगडू भाळे,  ज्ञानेश्वर अंबुरे,  मुंजाभाऊ गरड, बालू मुंडे, पिंटू दहिफळे, संजय व्हावळे,रमेश सरवदे,ओमकार स्वामी, भगवान साकसमुद्रे, धनंजय कांदे, क्षीरसागर प्रशांत, आदिंची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने