लोकांची सेवा करण्यासाठी नेताच बनावं असं काही नसतं
आपल्याकडे एक ढोबळपणे अशी एक धारणा असते की,लोकांची म्हणजेच जनतेची सेवा करण्यासाठी कार्यकर्ता, पुढारी केंव्हा नेता व्हावे लागते.एकदा नेता झालो की लोक आपल्याकडे येतील.त्यांची ग-हाणी मांडतील.मग माझं वजन वाढेल.समाजात इज्जत वाढेल.अधिकारी घाबरतील.हे सगळं तेंव्हाच होते जेंव्हा एखादा कार्यकर्ता कसा काम करतो.तो लोकांसाठी निस्वार्थ पणे किती धावून जातो.त्याला प्रश्न कसे सोडवायचे,कसे सोडवून घ्यायचे, त्यासाठी कोणाकडे जावे लागेल,परंतू असे अनेक कार्यकर्ता, पुढारी म्हणून मिरवतात पण कामाचा मात्र पत्ता नसतो.
कार्यकर्ता,नेता म्हटले की सर्वात प्रथम तो एक चांगला अभ्यासू पाहिजे.इतिहास,वर्तमान आणि भविष्य या तिन्ही बाबींकडे त्याचे लक्ष पाहिजे.चालू घडामोडींवर बारकाईने लक्ष पाहिजे.सरकारच्या धोरणावर लक्ष पाहिजे.कोणती धोरणे समाजाच्या हिताची आणि कोणती धोरणे समाज विरोधी आहेत.या धोरणांचा समाजाच्या प्रगतीवर काय परिणाम होणार आहे.जर समाजाचे, सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होणार असेल तर मग एक नेता म्हणून,एक कार्यकर्ता म्हणून माझी काय जबाबदारी आहे.मी काय करू शकतो.मी कसा आवाज उठवू शकतो.मी लोकांना जागृत कसे करू शकतो.हे नक्कीच कळायला पाहिजे.आणि कळल्यानंतर लोकांना घेऊन रस्त्यावर उतरायला पाहिजे.
ब-याचदा अशी वेळ येते लोक एखादी समस्या घेऊन, प्रश्न घेऊन कार्यकर्त्यांकडे येतात.कुणावर अन्याय झाला.अत्याचार झाला तर ती पिडीत व्यक्ती प्रथम एखादा कार्यकर्ता जवळ करते.त्याच्याकडे जाते आणि सर्व घटनाक्रम सांगते.पण ब-याच वेळा अशी व्यक्ती ज्या कार्यकर्त्यांकडे मदतीला जाते त्यालाच काही येत नसते.त्या पिडीत व्यक्तीची तक्रार कुठे करायची? कोणत्या अधिका-याकडे गेले पाहिजे? तक्रार अर्ज कसा लिहायचा? तक्रार अर्जाच्या प्रती कुणा कुणाला द्यायच्या आणि संबंधित पिडीत व्यक्तीला न्याय कसा मिळवून द्यायचा हे काही माहिती नसते.त्याला एकच माहिती असते मी कार्यकर्ता आहे.लोक मला कार्यक
आपण जर लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत.किंवा त्यासाठी काहीच करणार नसूत तर मग आपण खरेच कार्यकर्ते होऊ शकतो का? हा प्रश्न स्वतःलाच विचारण्याची गरज आहे.एखाद्या पक्षात प्रवेश घेतला.पद घेतले म्हणजे कार्यकर्ता झालो.पुढारी झालो.आता आपली लोकांत,प्रशासनात ओळख निर्माण झाली.आता आपण कुणाला भिण्याची आवश्यकता नाही असा गोड गैरसमज अनेकांचा असतो.आणि याच गैरसमजूतीत ते वावरत असतात.
लोंकाचे प्रश्न सोडविण्यासाठी एखाद्या पक्षात,संघनेत काम केले पाहिजे असे काही नाही.त्यासाठी कार्यकर्ते,नेता झाले पाहिजे असेही नाही.कुणीही सर्वसामान्य व्यक्ती ज्याला एखादा प्रश्न कसा सोडवायचा? कुणाकडे गेल्यानंतर तो प्रश्न सुटेल? त्याकरिता काय काय कायदेशीर कारवाई करावी लागेल?हे माहिती असते अशी व्यक्ती सहज लोकांचे प्रश्न सोडवू शकते.न्याय मिळवून देऊ शकते.
अशा व्यक्तींना आपण सामाजिक कार्यकर्ते म्हणतो.समाजात अशा अनेक व्यक्ती असतात ज्या कोणत्याही पक्षात, संघनेत काम करत नसतात पण लोकांच्या प्रश्नांवर लढत असतात.आवाज उठवत असतात.आंदोलने करतात, उपोषण करतात आणि जनतेचा प्रश्न सोडवितात.शासन- प्रशासनालाही दखल घ्यावी लागते.त्यांच्या या कार्यामुळे पिडित, अन्यायग्रस्त व्यक्ती, कुटुंब अशा समाजसेवकांडे जातात.
समाजात आपण जिथे आहोत.ज्या क्षेत्रात काम करीत आहोत ते आपले काम, व्यवसाय सांभाळूनही लोकांची सेवा करता येते.लोकांच्या प्रश्नांवर धावून जाता येते.विविध प्रश्नावरील आंदोलनात सहभागी होता येते.एक सर्व सामान्य नागरिक,आपण समाजाचे काही तरी देणं लागतो या उद्दात हेतूने प्रेरित होउन आपला सामाजिक कार्याचा वाटा उचलता येतो. पत्रकारितेच्या माध्यमातून अशा अनेक प्रश्नांवर मी आवाज उठवला आहे.परखड बातम्यांच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला आहे.आणि हे सहज शक्य असणारे काम प्रत्येक सुजाण नागरिकांनी, समाजातील सुशिक्षित लोकांनी, समाजातील ज्यांचे सर्व आर्थिक प्रश्न मिटले आहेत अशा व्यवसायिक, व्यापारी,नौकरदार, शिक्षक , प्राध्यापक, डॉक्टर, वकील आदी वर्गाने करायलाच पाहिजे.
रानबा गायकवाड
7020766674
लोकसेवक किंवा कार्यकर्ता यांची परिपूर्ण व्याख्याच तुम्ही आजच्या या लेखातून मांडली आहे... समाजकार्याची आवड असताना आपण कोणते भान ठेवले पाहिजे तेही सुंदर मांडले आहे.... समारोपातून केलेली अपेक्षाही छानच!
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा