महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या परभणीत धरणे आंदोलन
उपस्थित राहण्याचे भन्ते मुदितानंद यांचे आवाहन
परभणी प्रतिनिधी. बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी देश विदेशातील बौद्ध भिक्खूनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उद्या दिनांक 25 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात बौद्ध अनुयायांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भदन्त मुदितानंद यांनी केले आहे.
मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता धम्म मैत्री संवाद अभियानाच्या वतीने या धरणे आंदोलनांचे आयोजन करण्यात आले आहे.जगातील सर्व बौद्ध धर्मीयांचे श्रध्दास्थान असलेल्या बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापन समिती संपूर्ण बौद्धांच्या ताब्यात द्यावी,बी टी.कायदा 1949 रद्द करावा आदि प्रमुख मागण्यासाठी गेल्या दहा दिवसापासून महाबोधी महा
विहार बुद्ध गया येथे बौद्ध भिक्खू आंदोलन करीत आहेत.या आंदोलनाला देश विदेशातून पाठिंबा मिळत आहे.
विहार बुद्ध गया येथे बौद्ध भिक्खू आंदोलन करीत आहेत.या आंदोलनाला देश विदेशातून पाठिंबा मिळत आहे.
महाराष्ट्रात सुध्दा अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत.याच पार्श्वभूमीवर परभणी येथील आंबेडकरी पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे भन्ते मुदितानंद यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा