परळी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी शासकीय आधारभूत खरेदी केंद्र बंद पडल्याने संकटात आमचा लढा चालूच राहणार - अजय बुरांडे

परळी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी 
शासकीय आधारभूत खरेदी केंद्र बंद पडल्याने संकटात 

आमचा लढा चालूच राहणार - अजय बुरांडे 

परळी प्रतिनिधी.        परळी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी केंद्र सरकारने सुरू केलेले शासकीय आधारभूत खरेदी केंद्र बंद पडल्याने मोठ्या संकटात सापडला आहे.आता घरातील कष्टाने पिकविलेल्या सोयाबीनचे करायचे काय या विवंचनेत शेतकरी दिसत आहेत.दरम्यान शेतकऱ्यांसाठी आमचा लढा चालूच राहणार आहे असे मत किसान सभेचे बीड जिल्हा सेक्रेटरी एडवोकेट अजय बुरांडे यांनी व्यक्त केले आहे.
      परळी तालुक्यात शासनाचे तीन शासकीय आधारभूत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होते.या केंद्रावर शेतकऱ्यांना 4892 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळत होता.त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली सोयाबीन केंद्रावर घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनांसह रांगा लावल्या होत्या परंतु
केंद्र सरकारने 6 फेब्रुवारी रोजी सोयाबीन खरेदी केंद्र बंद केले. त्यामुळे आता काय करायचे हा प्रश्न शेतकऱ्यांकडे निर्माण झाला आहे. 
   खाजगी व्यापारी शेतकऱ्यांचा सोयाबीन डबल एक हजार रुपये कमी दराने खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे त्यामुळे शासकीय खरेदी केंद्र सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक आहे या प्रश्नी किसान सभेचे वतीने यापूर्वीही आंदोलन करण्यात आले होते.आणि पुढे सुध्दा ते सुरू राहील.शेतक-यांचा याला किती प्रतिसाद मिळतो हेही महत्त्वाचे असल्याचे अजय बुरांडे यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने