परळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी
मुख्याध्यापक विजयकुमार घुगे सरांनी घडविला विमान प्रवास
परळी प्रतिनिधी. विमान प्रवास म्हटलं की श्रीमंत व मध्यमवर्गीयांनाच शक्य आहे असे म्हटले जाते. परंतु परळी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळा मिरवट या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वप्नवत वाटणारी गगन भरारी घेतली आहे या सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आसमानी सफर घडवून आणण्याची किमया शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार घुगे यांनी केले आहे त्यांच्या या कार्याचे संपूर्ण
बीड जिल्ह्यात कौतुक होत आहे.
बीड जिल्ह्यात कौतुक होत आहे.
मुख्याध्यापक विजयकुमार घुगे यांनी प्रथम आपल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना परळी येथून नांदेडला घेऊन गेले आणि तेथून नांदेड ते हैदराबाद असे विमानाची सफर केली यादरम्यान हैदराबाद मधील प्रसिद्ध असे गोळकोंडा फोर्ट,सालारजंग म्युझियम,नेहरू बॉटनिकल गार्डन, व प्राणी संग्रहालय
लुंबिनी पार्क, लेझर शो, यामध्ये वॉटर फौंटनिंग द्वारा संपूर्ण हैदराबाद शहराचा इतिहास दाखवण्यात आला.
एनटीआर गार्डन,रेड लाईन ब्लू लाईन ग्रीन लाईन वर पूर्ण हैदराबाद शहरात मेट्रो द्वारे फेरफटका मारला.त्यानंतर हुसेन सागर बोटिंग द्वारे गौतम बुद्ध स्मारकास भेट दिली.नेकलेस रोड,आय मॅक्स मॉल जगप्रसिद्ध चारमिनार,बिर्ला मंदिर
बिर्ला प्लॅनेटोरियम यामध्ये संपूर्ण अवकाशाचे सर्व ग्रह तारे आकाशगंगा दर्शन घडवण्यात आले.
शेवटी नांदेड येथे गुरु गोविंद सिंग यांच्या गुरुद्वारा भेट दिली. विद्यार्थ्यांच्या गगन फरारीचे हे स्वप्न शालेय वयातच पूर्ण करण्याचे काम मुख्याध्यापक विजयकुमार घुगे सर, त्यांचे सहकारी शिक्षक वृंद अरविंद चौधरी सर, महादेव कुचेकर सर, श्रीमती वंदना कराड मॅडम, श्रीमती जयश्री पुरी मॅडम व रतनतात्या इंगळे शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष विद्यार्थी श्रीकांत भदाडे यग्नेश जाधव, सार्थक सुरवसे, अक्षरा इंगळे, जागृती बोंबले, धनराज भंडारे आदिंनी मोलाचे सहकार्य केले आहे.
परळीच नव्हे तर बीड जिल्ह्यात अतिशय कमी ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना गगन भरारी घेण्याची (विमानाने सहलीला जाण्याची) संधी मिळाली आहे.... मुख्याध्यापक आणि या सहलीचे उत्तम नियोजन करणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे मनःपूर्वक अभिनंदन!💐👌🏻💐
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा