देशपातळीवर परळीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या राजू जगतकर,आरती बोकरे , आनंद बनसोडे यांचा सत्कार संपन्न

देशपातळीवर परळीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या राजू जगतकर,आरती बोकरे , आनंद बनसोडे यांचा सत्कार संपन्न 


  परळी प्रतिनिधी   देशपातळीवर विविध क्षेत्रात परळीचे नाव उज्ज्वल करणाऱ्या राजू जगतकर,आरती बोकरे व आनंद बनसोडे यांचा भीमनगर येथील सुंगधकुट्टी बुद्ध विहारात भव्य असा सत्कार करण्यात आला.
      सुगंधकुट्टी बौद्धविहार येथे दर रविवारी बुद्ध वंदे चा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या दिनाचे औचित्य साधून परळी शहरातील भिमनगर, जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बुद्ध विहार येथे परळीची भूमिपुत्र असलेले इंजिनीयर राजू जगतकर, आरती बोकरे व आनंद बनसोडे या मान्यवरांचा दि.9/ 2/ 25 रोजी येथील सुगंध कुटी बुद्ध विहार येथे सुरुवातीला बुद्ध वंदना घेऊन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून भिमनगर येथील कु. आरती बोकरे हिची अन्न व औषध प्रशासन अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच आनंद ज्ञानोबा बनसोडे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल व इंजि. राजू श्रावण जगतकर यांची दुबई येथे बुलेट ट्रेनच्या ऑपरेशन मॅनेजर पदी भारत देशातून निवड झाल्याबद्दल शाल पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून हृदय सत्कार करण्यात आला असल्याची माहिती साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली.
       सत्काराला उत्तर देताना कु. आरती बोकरे हिने या पदाचा समाजाच्या हितासाठी उपयोग करणार आहे. माझ्यासारखे यशस्वी विद्यार्थी आपल्या भागात घडविण्यासाठी मी या भागातील मुलांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास कधीही तयार आहे.तर इंजि. राजू जगतकर यांनी उपस्थित पालकांना  समजावून सांगितले की  विद्यार्थी यांना कुठल्याही वळणावर यश खेचून आणता येते परंतु त्यात सातत्य असणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच वेगवेगळे शिबिरे व तज्ञ व्यक्तींची मार्गदर्शन  व्याख्याने आपण या भागात ठेवणार आहोत असे सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते
  यावेळी कु.आरती बोकरे हिचा सत्कार प्रा. डॉ. यशश्री बालासाहेब जगतकर, रंभा बालासाहेब जगतकर, ज्योती सारनाथ जगतकर, व लिंबूबाई वसंत बनसोडे, यांच्या हस्ते तर आनंद बनसोडे यांचा सत्कार विलास आदोडे, उत्तम समुद्रे, वसंत बनसोडे, संजय जगतकर, राजेभाऊ जगतकर, आधीच्या हस्ते करण्यात आला तर इंजि.राजू श्रावण जगतकर यांचा सत्कार सोपान ताटे, मिलिंद बनसोडे, शंकरराव साळवे, अशोक जगतकर,एच.टी. वाघमारे यांच्या हस्ते करण्यात  आला.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य सिद्धार्थ जगतकर यांनी तर आभार प्रदर्शन अनिल मस्के यांनी मानले या कार्यक्रमास संपादक बालाजी श्रावण जगतकर, प्रा. संघपाल समुद्रे, प्रा.विलास रोडे गडदे, भानुदास जंगले, विकास जगतकर, यश जंगले, दीपक शिरसाट, विलास केदारे, दर्शन ताटे, राज जगतकर किरण तरकसे अवचारे सुनील गोदाम संकेत बनसोडे अरविंद बनसोडे वैजनाथ बनसोडे, सुरेश घाडगे लक्ष्मण जगतकर, अपर्णा बनसोडे, वंदना जंगले, यांच्या सह बालक, बालिका,महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने