दाऊतपुर ग्रामस्थांचे 5 व्या दिवशी उपोषण मागे परळी वीज निर्मिती केंद्राने राख उचलण्याच्या कोट्यात केली वाढ

दाऊतपुर ग्रामस्थांचे 5 व्या दिवशी उपोषण मागे 
परळी वीज निर्मिती केंद्राने राख उचलण्याच्या कोट्यात केली वाढ 

परळी प्रतिनिधी  

   परळी औष्णिक विद्युत  केंद्राने काढलेली राखेचे टेंडर निविदा रद्द करावी, राख उचलण्याच्या कोटा 100% प्रदूषण बाधित दाऊतपुर गावाला द्यावा आदी मागण्यासाठी 4 फेब्रुवारीपासून दाऊतपूर राख नियंत्रण कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेले उपोषण आज शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी मागे घेण्यात आले. मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी प्रदूषण बाधित दाऊतपूरला राख उचलण्याच्या कोटा 20 टक्के वरून 50 टक्के करीत असल्याचे सांगितल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. 
      याविषयी अधिक माहिती अशी की, मौजे दाऊतपुर राख नियंत्रण कृती समितीच्या वतीने परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र च्या संच क्रमांक 6  व 7 च्या गेट समोर  04 फेब्रुवारी पासून उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणांमध्ये वीज निर्मिती केंद्राने काढलेले राखेचे टें
डर रद्द करावे, तसेच शंभर टक्के राख उचलण्याचा कोटा देऊन विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली होती. 
    दरम्यान गेले पाच दिवसांपासून सुरू असलेले आमरण उपोषण आज परळी औष्णिक विद्युत  निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले .यावेळी प्रदूषण बाधित दाऊतपूरला 20 टक्के राखेचा कोटा हा वाढवून 50 टक्के देण्यात आला तसेच राख  निविदाची तारीख पूर्वी 10 फेब्रुवारी होती ते 25 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे. उपोषण करणाऱ्या राख नियंत्रण कृती समितीचे शिष्टमंडळ व मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लवकरच बैठक घडवून आणू असे आश्वासनही याप्रसंगी सुनील इंगळे यांनी दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी  पाचव्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले. तसेच यावेळी मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांनी राखेचे प्रदूषण कमी करण्यासंदर्भात सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
   या उपोषण मागे घेताना मुख्य अभियंता सुनिल इंगळे यांनी कृती समितीचे अध्यक्ष सुग्रीव बिडगर, यांना लिंबू पाणी देऊन उपोषण सोडविले. तर यावेळी उपोषण कर्ते अंगद बिडगर, गौतम भंडारे ,प्रशांत बिडगर, राहुल दगडू भालेराव, सुभाष फड, बेबीनंदा बिडगर, छायाबाई फड, अनुसया भालेराव, कुसुमबाई सोडगीर, इंदुबाई फड ,अनिता गायकवाड, महादेव गडदे, रमेश गायकवाड विश्वनाथ बिडगर, महेश बिडगर, अनिकेत बिडगर, अजय बिडगर सुभाष बिडगर, फड पुंडलिक, सोडगीर मारुती, सुमित सुरवसे, जय राम काचगुंडे संगीत बिडगर, धोंडीबा फड, बळीराम बिडगर ,विशाल बिडगर ,अविनाश बिडगर, रवींद्र गायकवाड ,अक्षय बिडगर ,सचिन हरभरे विश्वनाथ बिडगर ,प्रदीप चोरमले व मुंडे गणेश आदी उपोषणकर्ते होते. तर याप्रसंगी औष्णिक विद्युत  निर्मिती केंद्राचे उप मुख्य अभियंता एच. के.अवचार,कल्याण अधिकारी शरद राठोड,Ash Utilisation Cell चे कार्यकारी अभियंता महादेव मुंडे ,अभियंता अरुण गिते, सुरक्षा अधिकारी कुलकर्णी तसेच सरपंच श्रीकांत फड, माजी सरपंच प्रवीण बिडगर व शिवदास बिडगर आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने