राखेच्या बंधाऱ्यातील 100 टक्के कोटयाच्या मागणीसाठी दाऊतपूर वासियांच्या उपोषणाचा चौथा दिवस
परळी प्रतिनिधी. परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील राखेच्या बंधाऱ्यात जमा होणाऱ्या राखेतील 100 टक्के राख उचलण्याचा कोटा सर्वाधिक प्रदूषित बाधित दाऊदपूरला द्यावा तसेच वीज निर्मिती केंद्राने काढलेले पॉन्ड एश टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी आदी मागण्यासाठी दाऊतपुर येथील नागरिकांनी वीज निर्मिती केंद्राच्या नवीन संच क्रमांक 6 व 7 च्या गेट समोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस असून वीज निर्मिती केंद्राच्या अधिका-यांशी चर्चा फिसकटल्याने उपचार घेणारेही पुन्हा उपोषण स्थळी बसले आहेत.
प्रदूषण बाधित दाऊतपुर येथील पॉन्ड एश टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी व प्रदूषण बाधित स्थानिक नागरिकांना 100 टक्के कोटा आपण ठरवून दिलेल्या बेसिक दर 75 रुपये प्रति टन दराप्रमाणे उचलण्याची परवानगी द्यावी. प्रदूषण बाधित बेरोजगार युवकांना 16 हजार रुपये प्रशिक्षण व मानधन द्यावे, तसेच कें
द्र सरकारच्या नियमानुसार मौजे दाऊतपूरला सीएसआर निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांसाठी दाऊतपूर राख नियंत्रण कृती समितीच्या वतीने 4 फेब्रुवारी पासून परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या संच क्रमांक 6 व 7 च्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू आहे.
द्र सरकारच्या नियमानुसार मौजे दाऊतपूरला सीएसआर निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांसाठी दाऊतपूर राख नियंत्रण कृती समितीच्या वतीने 4 फेब्रुवारी पासून परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या संच क्रमांक 6 व 7 च्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू आहे.
आज या प्रशनी वीज निर्मिती केंद्राचे अधिकारी व उपोषण कर्ते यांच्यात तहसील प्रशासनासमवेत चर्चा झाली.परंतू मागण्यांचा योग्य विचार झाला नाही यामुळे उपोषण पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.दरम्यान प्रकृती बिघडल्याने दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला अनुसया दगडू भालेराव, कुसूमबाई नरहरी सोडगीर ,सौ.अनिता रमेश गायकवाड, सुभाष इंद्रजित फड,व मारुती नरहरी सोडगीर हे पुन्हा उपोषण स्थळी येऊन बसले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा