गुणवंतांच्या सत्कारामुळे इतरांना प्रेरणा मिळते आरती बोकरे
शहरातील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा दै.मराठवाडा साथी कार्यालयात सत्कार संपन्न
परळी /प्रतिनिधी-
गुणवंतांच्या सत्कारामुळे इतरांना प्रेरणा मिळते तसेच परळी शहरातील अशा कार्यक्रमामुळे शहराचे राज्यात नावलौकिक होण्यास मदत होते असे प्रतिपादन नुकतेच अन्न प्रशासन अधिकारी पदी निवड झालेल्या आरती बोकरे यांनी केले. दै. मराठवाडा साथीच्या वतीने आयोजित साथी कार्यालयात दै.मराठवाडा साथीच्या वतीने एमपीएससी च्या वतीने अन्न व औषध प्रशासन अधिकारी पदी निवड झालेल्या आरती बोकरे हिचा डॉ. सौ. ज्योती दौंड
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
एमपीएससी च्या वतीने अन्न व औषध प्रशासन अधिकारी पदी निवड झालेल्या आरती बोकरे हिचा दै.मराठवाडा साथीच्या वतीने डॉ. ज्योती दौंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आरती बोकरे यांनी सत्काराला उत्तर देताना आपण कशा परिस्थितीत शिक्षण घेतले हे सांगितले. तसेच सत्कारामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते असेही त्या म्हणाल्या.
यावेळी भारत सरकारच्या नोटरी पदी निवड झालेले अॅड. संजय रोडे, तसेच पुरोगामी पत्रकार संघाच्या राज्यकार्यक्षपदी निवड झालेले पत्रकार प्राध्यापक दशरथ रोडे, तसेच राज्य पातळीवरील पुरस्कार प्राप्त संपादक बालासाहेब जगतकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेले पत्रकार बालाजी ढगे व प्रधान सचिवपदी निवड झालेले युवा पत्रकार विकास वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान याच कार्यक्रमात जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अतुल दुबे व पत्रकार अनुप कुसुमकर यांचाही वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, दै.मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक ओमप्रकाश बुरांडे, पुण्यनगरीचे परळी शहर प्रतिनिधी धनंजय आरबुने, दै.संघर्षनेताचे संपादक मोहन व्हावळे, पत्रकार भगवान साकसमुद्रे, पत्रकार नितीन ढाकणे, पत्रकार गणेश आदोडे, पत्रकार संदीप मस्के, संतोष जुजगर, नरसिंग अन्नलदास, सुमित गिरी, लक्ष्मण वैराळ सर, संदीप समुद्रे, अनिल गायकवाड, रवि पतंगे, श्रीधर जोशी आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा