मौलाना आझाद चौकातील सागर हॉटेल समोरील अतिक्रमण काढावे अन्यथा 26 जानेवारी पासून मजहर पठाण करणार आमरण उपोषण
परळी प्रतिनिधी. मौलाना आझाद चौकात असणाऱ्या सागर हॉटेल समोरील रस्त्यावरील अतिक्रमणामुळे नागरिकांना व वाहनधारकांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच या मार्गावरील येणाऱ्या भाविक भक्तांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदरील अतिक्रमण त्वरित काढावे अन्यथा दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी परळी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मजहर पठाण यांनी एका निवेदनाद्वारे परळीच्या मुख्याधिकारी यांना दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात पठाण यांनी पुढे म्हटले आहे की, सागर हॉटेल समोरील रस्त्यावर आमच्या गल्लीतील वयोवृद्ध नागरिक, पुरुष, महिला, लहान मुले हे ये जा करीत असतात. तसेच शाळेत आणि महाविद्यालयात जाणारे विध्यार्थ्यांना अडथळा व त्रास होत आहे.
याबरोबरच गल्लीतील घराला चिटकून हॉटेलच्या किचनच्या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. किचन मध्ये असणाऱ्या चार ते पाच गॅस वापरले जातात त्यामुळे वृद्धांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सदर रस्त्यावर असणारे अतिक्रमण परळी नगर परिषदेने त्वरित काढावे व रस्ता मोकळा करावा अन्यथा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मजहर पठाण यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बीड, उपविभागीय अधिकारी परळी वैजनाथ, तहसीलदार परळी व शहर पोलीस स्टेशन परळी आदींना देण्यात आल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा