आदर्श महाविद्यालयाचा आदर्श उपक्रम गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना केले अर्थसहाय्य

आदर्श महाविद्यालयाचा आदर्श उपक्रम 
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना केले अर्थसहाय्य

हिंगोली (प्रतिनिधी)
   शाळा व महाविद्यालये ही ज्ञानाचे केंद्र असतात. सर्वसामान्यच नव्हे तर प्रत्येकासाठी  आदर्श असतात. असाच आदर्श उपक्रम आदर्श महाविद्यालय हिंगोली यांनी घेतला आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने अर्थसहाय्य करण्यात आले. या आदर्श उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
   आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथे प्रवेशित असलेल्या गरजू, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांस महाविद्यालयामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत चालवण्यात येणाऱ्या आदर्श स्टुडन्ट वेल्फेअर ट्रस्ट या संस्थेंतर्गत २१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०,५००/- रुपये अर्थसाह्य धनाकर्षांद्वारे प्रदान करण्यात आले.  ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती बिकट व हलाखीची आहे अशा विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी महाविद्याल
यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य व ट्रस्टचे अध्यक्ष प्रो. डॉ. विलास आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली एक निवड समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये उपप्राचार्य प्रा. रमेश दळवी, प्रा.पंढरीनाथ घुगे, प्रा. गजानन चव्हाण, डॉ. शैला वाघ, डॉ. बस्वराज लक्षटे, डॉ. आशिष गट्टाणी, प्रा. ज्योती शंकपाळे, डॉ. सुरेंद्र साहू, प्रा. वसंत पडोळे आणि प्रा. वर्षा सावतकर यांनी संपूर्ण कामकाज केले. 
   या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी गरजू व होतकरू विद्यार्थी शोधण्याकरिता मुलाखतीद्वारे प्रयत्न करण्यात आले.  विद्यार्थी महाविद्यालयात नियमित उपस्थित असून अभ्यासात सातत्य ठेवून आहेत परंतु केवळ आर्थिक विवंचनेच्या कारणाने त्यांचा गुणात्मक विकास होत नाही असे निदर्शनास आल्याने या विद्यार्थ्यांना हे अर्थसाह्य देण्यात आले.
  प्रस्तुत धनादेश वितरणाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि स्टुडन्ट वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष प्रो. डॉ. विलास आघाव हे होते.  याप्रसंगी गरजू व होतकरु विद्यार्थ्यांनी प्रस्तुत रकमेचा विनियोग हा शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी व गुणात्मक विकासाकरिता करावा असा आशावाद अध्यक्षांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बस्वराज लक्षटे यांनी केले.  याप्रसंगी विचारपीठावर महाविद्यालयाचे अधीक्षक श्री दिलीपकुमार दुबे, अस्थापना प्रमुख श्री. कैलास डिडाळे, ट्रस्टचे सचिव डॉ. दयाराम मस्के, कोषाध्यक्षा प्रा. वर्षा सावतकर, डॉ. शैला वाघ, ग्रंथपाल ज्योती शंकपाळे, डॉ. विलास पवार, प्रा. सुभाष पोले हे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून प्रो. डॉ. शत्रुघ्न जाधव यांच्यासह बहुसंख्य पालक देखील उपस्थित होते. 

   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दुर्गादास टापरे,  श्री संजय राठोड आणि धम्मरत्नं इंगोले  यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे आदर्श स्टुडन्ट वेल्फेअर ट्रस्टचे सचिव डॉ. दयाराम मस्के यांनी केले तर अभार प्रकटीकरण हे डॉ. शैला वाघ यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने