शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना दिलीप भालेराव यांच्याकडून 11000 रुपयांची मदत

शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना दिलीप भालेराव यांच्याकडून 11000 रुपयांची मदत

परळी प्रतिनिधी.       परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची मनुवाद्यांनी तोडफोड केली होती. या घटनेनंतर परभणी शहरात आंबेडकर अनुयायांनी तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनात पकडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिसांनी केलेल्या अत्याचारात मृत्यू झाला होता. शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना परळी तालुक्यातील आदर्श शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेराव यांनी 11000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
      सोमनाथ सूर्यवंशी हा भीमसैनिक परभणी येथे पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमध्ये मृत्युमुखी पडला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशभर तीव्र संतापाची लाट उसळली होती. तसेच या घटनेत जबाबदार असणाऱ्या

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे. तसेच या प्रकरणी आंबेडकरी अनुयायांनी परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढलेला आहे.
     जोपर्यंत राज्य शासन दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत शासनाची मदत घेणार नाही अशी भूमिका सूर्यवंशी कुटुंबियांनी घेतलेली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना आंबेडकरी समाजातून आर्थिक मदत केली जात आहे. यामध्ये आपला खारीचा वाटा आणि सामाजिक भूमिका म्हणून परळी तालुक्यातील आदर्श शिक्षक दिलीप भालेराव गुरुजी यांनी अकरा हजार रुपये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना पाठविले आहेत. ज्यांना कोणाला सूर्यवंशी कुटुंबीयांना आर्थिक मदत करायची असेल त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक, विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी, खाते 80011387658 या बँक खात्यावर आपली मदत पाठविण्याचे आवाहनही  केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने