बांगलादेशातील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ परळीत हिंदू जन आक्रोश मोर्चा संपन्न

बांगलादेशातील हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ

परळीत हिंदू जन आक्रोश मोर्चा संपन्न 

परळी प्रतिनिधी.     बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ परळी शहरात भव्य असा हिंदू जन आक्रोश मोर्चा संपन्न झाला.
    बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत. या अत्याचाराच्या निषेधार्थ परळी शहरात आज दिनांक 10 डिसेंबर रोजी समस्त
हिंदू बांधवांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 
      शहरातील राणी लक्ष्मीबाई टावर येथून या मोर्चास  सुरुवात झाली. मोंढा मार्केट, एकमिनार चौक, बस स्टँड मार्गे मोर्चा छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर राष्ट्रगीताने या मोर्चाची सांगता झाली. या मोर्चात मोठ्या संख्येने हिंदू महिला, पुरुष सहभागी झाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने