विनोद कांबळी आणि बॅड पॅच
मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर विनोद कांबळी च्या बाबतीत त्याची जी आज अवस्था झाली आहे याविषयी विविध कॉमेंट्स येत आहेत .अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.आज त्याचे जे अवस्था झाली आहे यामागे त्याचे वैयक्तिक जीवनात त्याने शिस्त पाळली नाही, दारूच्या आहारी गेला असे विविध कारणे येत आहेत.
परंतु एक गोष्ट निश्चित आहे विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांचे भारतीय क्रिकेट संघातील पदार्पण एकदाच थोडेसे अंतराने झाले. खेळाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर दोघेही सर्वोत्तम. मुंबईतील शालेय क्रिकेट स्पर्धेतील दोघांचे वैयक्तिक 300 धावा आणि 600 पेक्षा अधिक धावांची नाबाद भागीदारी याचे रेकॉर्ड अद्याप कोणीही तोडलेले नाही.
आर्थिक दृष्ट्या विचार केला तर विनोद कांबळी निश्चितच सर्वसाधारण कु
टुंबातून आला होता. परंतु क्रिकेटमधील त्याच्या प्रतिभेच्या जोरावर तो भारतीय संघात निवडला गेला. नंतर सचिन तेंडुलकर जागतिक क्रिकेटवर एक चमकता तारा म्हणून प्रसिद्ध झाला. मोजक्याच दिग्गज खेळाडूंच्या यादीत सचिनचे नाव घेतले जाते . आज सचिन तेंडुलकरच्या नावावर क्रिकेटच्या सर्वच प्रकारात अनेक विश्वविक्रम आहेत.परंतु विनोद कांबळी कुठेही कमी नव्हता. सचिन तेंडुलकरला कसोटी क्रिकेटमध्ये दोनशे धावा करण्यासाठी अनेक कसोट्यांची वाट पहावी लागली होती परंतु हे काम सचिन तेंडुलकरच्या अगोदर विनोद कांबळी ने दोनदा द्वीशतके ठोकून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. तो चौफेर फटकेबाजी करायचा. त्यामुळे क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील सचिन तेंडुलकर प्रमाणेच तोही ताईत बनला होता.

पण नेमके काय झाले सचिन तेंडुलकर पुढे गेला आणि विनोद कांबळी मागे पडला .करोडत खेळणारा विनोद कांबळी आज असाह्य झाला आहे. या परिस्थितीत येण्यामागे त्याच्या जीवनातील ज्या काही वाईट गोष्टी असतील याचा समावेश नक्कीच असेल परंतु एक मात्र तितकेच सत्य आहे विनोद कांबळीच्या ऐन भरात अणि तो जोशात असतांना भारतीय क्रिकेट निवड समितीने मात्र भारतात झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप मधील भारत श्रीलंका सामन्यातील भारताच्या पराभवानंतर कांबळीला पुन्हा उभारण्याची संधीच दिली नाही. या सामन्यात एका बाजूने धडाधड विकेट जात होत्या अशा वेळी विनोद कांबळी दुसऱ्या बाजूने भक्कमपणे उभा होता. एरव्ही गुणवत्ता नसतानाही अनेक खेळाडूंना पुन्हा पुन्हा सावरण्याची संधी मिळाली परंतु ते सावरलेच नाहीत .परंतु एका उत्कृष्ट क्रिकेटपटू चा अंत होण्यामागे मला भारतीय तत्कालीन निवड समितीही कारणीभूत वाटते.
टिप्पणी पोस्ट करा