इमर्जन्सी दरवाजा उघडा ठेवून बस रस्त्यावर वेगाने धावू लागली

इमर्जन्सी दरवाजा उघडा ठेवून बस रस्त्यावर वेगाने धावू लागली 

अंबाजोगाई प्रतिनिधी.       संकटकाळी एसटी बसेस साठी असणारा इमर्जन्सी दरवाजा चक्क उघडा ठेवून रस्त्यावर सुसाट वेगाने धावणाऱ्या एसटी बसमुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची घटना आज दिनांक 28 रोजी अंबाजोगाई परळी रस्त्यावर घडल्याचे पहावयास मिळाले. 
     याबाबत अधिक माहिती अशी की अंबाजोगाई येथून परळी कडे एसटी बस क्रमांक एम एच 24 यु 77 32 ही गाडी येत होती. या एसटी बसचा मागील बाजूने असणारा इमर्जन्सी दरवाजा उघडा होता. तरीही सदर बस रस्त्यावरून धावत होती .एस. टी. मागे असणाऱ्या जागरूक नागरिक व पत्रकार विद्याधर शिरसाट यांनी या बसचा फोटो पिंपळाधायकोडा या
गावाच्या दरम्यान घेतला. त्यामुळे ही बाब उघडकीस आली. 
    संकटकाळी प्रवाशांना एसटी बस मधून तात्काळ बाहेर पडता यावे म्हणून बसच्या रचनेत इमर्जन्सी दरवाजांची सुविधा असते. प्रवाशांनी  संकट समयी हे दरवाजे उघडून बाहेर पडायचे असते. परंतु अशा प्रकारे रस्त्यावरून वेगाने धावणाऱ्या बसचे इमर्जन्सी दरवाजेच उघडे राहिल्याने त्यामुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो या बाबीकडे सदर एसटी चालक आणि वाहकांनी लक्ष देण्याची गरज होती. परंतु यामध्ये निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने