पंचशीला बनसोडे यांचे दुःखद निधन
आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार
परळी प्रतिनिधी. शहरातील सामाजिक कार्यकर्त्या व अंगणवाडी सेविका पंचशीला अरुण बनसोडे यांचे आज सकाळी नांदेड येथे उपचारादरम्यान नुकतेच दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 1 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पंचशीला बनसोडे या काही दिवसापूर्वी अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या.यामध्ये त्यांच्या डोक्यास मार लागला होता.त्यांच्यावर सुरवातीला परळी येथे व पुढे अंबाजोगाई येथील खासगी रुग्णालयात व सध्या नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.उपचार दरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4.30 वा.भीमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांची अंत्ययात्रा मिलिंद नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,आई, वडील,भाऊ, बहीण असा भरगच्च परिवार आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य दिवंगत विजयकुमार गंडले तसेच प्रसिद्ध साहित्यिक अजयकुमार गंडले, गौतम गंडले यांच्या त्या भगिनी होत्या.मृत्यूसमयी त्या 47 वर्षाच्या होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा