परळी विधानसभा मतदानासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात

परळी विधानसभा  मतदानासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात 

परळी प्रतिनिधी.      परळी विधानसभा मतदार संघासाठी प्रचाराची रणधुमाळी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली आहे. आता बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांना शांततेने मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
    233 परळी विधानसभा मतदार संघात एकूण 363 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडावे तसेच कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक 1, डीवायएसपी 2, पोलीस निरीक्षक 7 , एपीआय तसेच पीएसआय दर्जाचे 24 अधिकारी, पोलीस कर्मचारी 457, होमगार्ड 292, सीआय.एस.एफ.ची एक कंपनी (100) , एस. आर. पी. एक प्लाटून,एनसीसी 35, तसेच सेवानिवृत्त 25 क
र्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहे. 
     याबरोबरच अति संवेदनशील केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तसेच बहुतांश मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.दरम्यान काल परळी शहरातुन संभाजीनगर पोलीस स्टेशन तसेच शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व प्रमुख मार्गावरून पथसंंचालन करण्यात आले. त्यामुळे निवडणुकीत गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांचा प्रसाद बसू शकतो.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने