डॉ. गणेश चंदनशिवे यांना मराठवाडा गौरव सन्मान जाहीर
29 नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार वितरण सोहळा
मुंबई प्रतिनिधी:
भारतीय सिनेयुग प्रोड्कशन व अकादमी मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा मराठवाडा गौरव सन्मान मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे प्रमुख, प्रख्यात लोककला अभ्यासक तथा सिने गायक डॉ. गणेश चंदनशिवे यांना जाहीर करण्यात आला आहे.29 नोव्हेंबर रोजी मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
भारतीय सिनेयुग प्रोड्कशन व अकादमी मुंबईचे,संचालक अनिल शिंपी यांनी या भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन केले असून मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फे
स्टिव्हल(मीफ)२०२४
स्टिव्हल(मीफ)२०२४
शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर (पश्चिम), मुंबई,
येथे दि.२९ नोव्हेंबर रोजी पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
मराठवाडा गौरव सन्मान जाहीर झाल्याबद्दल डॉ. गणेश चंदनशिवे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन अभिनंदन होत आहे. यापूर्वी डॉ.गणेश चंदनशिवे यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा