विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार परळीत आरोप - प्रत्यारोपाच्या फैरीने वातावरण तापले

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार 

परळीत आरोप - प्रत्यारोपाच्या फैरीने वातावरण तापले


परळी प्रतिनिधी.         महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निवडणूक प्रचाराच्या तोफा आज दिनांक 18 रोजी थंडावणार आहेत . महायुती,महाविकास आघाडी,  वंचित बहुजन आघाडी या विविध राजकीय पक्षांनी संपूर्ण महाराष्ट्र जाहीर सभांच्या माध्यमातून पिंजून काढला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे व महाविकास  आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचाही प्रचार आज संपणार आहे. 
      22 ऑक्टोंबर पासून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती.5  नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष प्रचारास सुरुवात झाली होती. आज दिनांक 18 ऑक्टो
बर पर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच महायुतीचे घटक पक्ष असलेले भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रातील सर्व मतदार संघातून जोरदार प्रचार यंत्रणा राबविली होती.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी, प्रियंका गांधी याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर, ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे,शिवसेनेचा नेत्या सुषमाताई अंधारे, यांच्यासह विविध स्टार प्रचारक असणाऱ्या नेत्यांच्या तुफान सभा महाराष्ट्रातील मतदारांनी प्रत्यक्ष अनुभवल्या.
    पंधरा दिवस चाललेल्या निवडणुकीच्या  प्रचाराची रणधुमाळी आज दिनांक 18 रोजी सायंकाळी 6  वाजता निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे संपणार आहे .त्यामुळे परळी शहरात महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे व महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या निवडणूक प्रचार सांगता सभा आणि प्रचार रॅली परळी शहरातून निघणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने