धनंजय मुंडेचा मीच पराभव करू शकतो
शरद पवार साहेबांनी मला संधी द्यावी - फुलचंद कराड
परळी प्रतिनिधी. परळी शहरात दादागिरी, गुंडगिरी प्रचंड प्रमाणात वाढली असून आगामी विधानसभा निवडणुकीत सध्याचे आमदार व पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांचा मीच पराभव करू शकतो असे प्रतिपादन भगवान सेनेचे सरसेनापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फुलचंद कराड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
फुलचंद कराड यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना ते म्हणाले की,जे कोणी शरद पवार साहेबांना तिकीटासाठी भेटले आहेत त्यांना शरद पवार यांनी शब्द दिलेला नाही.त्यामुळे आता जे काही करतील ते शरद पवार हेच ठरवतील.
फुलचंद कराड यांनी
दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवून सुमारे 65 हजार मतदान घेतले होते.परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद सर्व क्षेत्रात फुलचंद कराड यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी मला संधी दिली तर मी धनंजय मुंडे यांची लोकसभेतील जी मतांची आघाडी होती ती कमी करून त्यांचा पराभव करीन असेही फुलचंद कराड म्हणाले.दरम्यान धनंजय मुंडे यांच्या विरोधात वंजारी उमेदवार शरद पवार यांनी द्यावा असेही ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा