संत चोखामेळा ट्रस्टच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यासाठी बौद्ध समाज एकवटला संत चोखामेळा ट्रस्ट बचाव कृती समितीची होणार स्थापना

संत चोखामेळा ट्रस्टच्या जागेतील अतिक्रमण हटवण्यासाठी बौद्ध समाज एकवटला 

संत चोखामेळा ट्रस्ट बचाव कृती समितीची होणार स्थापना

परळी प्रतिनिधी.       शहरातील निजाम काळापासून अस्तित्वात असलेल्या नेहरू चौक नजीक संत चोखामेळा ट्रस्टची जागा आहे. या जागेवर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी बौद्ध समाजाची व्यापक अशी बैठक आज दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी जिजामाता उद्यानात संपन्न झाली .या बैठकीत संत चोखामेळा ट्रस्ट बचाव कृती समिती स्थापन करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. यासाठी लवकरच पुढील दिशा एक बैठक घेऊन  ठरविण्यात येणार आहे.
      याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील जगमित्र नागा मंदिर, तसेच सोपान काका मंदिर, आणि संत चोखामेळा मंदिरासाठी निजामाने जमिनी दिल्या होत्या. त्यामुळे संत चोखामेळा ट्रस्ट पुढे स्थापन करण्यात येऊन सदर जमीन ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आली. परंतु या जमिनीवर पुढे चहुबाजूने अनेकांनी अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे चोखामेळा यांचे अनेक कार्यक्रम सध्या बंद पडलेले आहेत. 
    संत चोखामेळा हे वारकरी संप्रदायातील महान असे संत होते. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी प्रत्येक जण संत चोखामेळा यांचे दर्शन घेत असतो. संत चोखामेळा यांनी बौद्ध विचारावर समतेचे पेरणी केलेले आहे. त्यांचे साहित्य हे परिवर्तनवादी आणि तत्कालीन समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करणारे होते. महाराष्ट्रातील महान संतांच्या यादीमध्ये चोखामेळा यांचा उल्लेख करण्यात येतो.
परळी येथील त्यांच्या नावे असलेल्या ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी जिजामाता उद्यान येथे समाजाचे आज व्यापक बैठक संपन्न झाली .या बैठकीत भव्य असे चोखामेळा भवन निर्माण करणे, जागेवरील अतिक्रमण काढणे आदींसह  ट्रस्टमध्ये विश्वासतांना सोबत घेऊन आवश्यक ती कार्यवाही करणे असे ठरले. यासाठी लवकरच पुढील बैठक घेण्यात येणार आहे.
     या बैठकीस समाजातील सर्व ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, समाज बांधव , महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने