राणी लक्ष्मीबाई टॉवरवर वाढले पिंपळाचे झाड
ऐतिहासिक इमारतीस तडे जाण्याची शक्यता
परळी प्रतिनिधी. परळी वैभव असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई टॉवरवर पिंपळाचे झाड वाढले असून हे झाड मोठे झाल्यास ऐतिहासिक अशा इमारतीस तडे जाण्याची शक्यता आहे. परळी नगर परिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज असून टॉवरची स्वच्छता करण्याची गरज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परळी शहरातील मुख्य चौक म्हणून राणी लक्ष्मीबाई टॉवरला ओळखले जाते. या ठिकाणी परळी नगरपरिषद अस्तित्वात येण्याच्या अगोदर पासून राणी लक्ष्मीबाई टॉवरची निर्मिती करण्यात आली होती. परळी शहरातील ही ऐतिहासिक वास्तू शहराच्या वैभवात भर घालणारी आहे. परंतु राणी लक्ष्मीबाई टॉवरला अनधिकृत बॅनर, पोस्टर, पापलेट लावून टावरचे विद्रूपीकरण करण्यात येत आहे. आता निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता लागल्यामुळे तरी किमान पोस्टर काढण्याचे का
म नगरपालिकेने केले.
म नगरपालिकेने केले.
याबरोबरच टॉवरच्या वरच्या भागावर पिंपळाचे झाड वाढत आहे. सदर झाड आणखी वाढत गेल्यास या इमारतीला तडे जाऊन इमारत पडू शकते. तसेच इतरही गवत इमारतीवर वाढले आहे याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष दिसून येत आहे. सदर ऐतिहासिक वास्तू टिकावी यासाठी या टॉवरचे सुशोभीकरण करून टॉवरवर वाढलेले झाडे झुडपे काढण्याचे गरज आहे.
टिप्पणी पोस्ट करा