शेतकरी संवाद यात्रेला परळी मतदारसंघात शेतकऱ्यांच्या उदंड प्रतिसाद
परळी विधानसभा मतदारसंघात प्रचंड बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही , विकासात्मक पातळीवर कृषिमंत्री ठरले फेल- सुनील भैया गुट्टे
शेतकरी संवाद यात्रेने 700 किलोमीटरचा केला प्रवास
परळी प्रतिनिधी: परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली होती. मतदार संघात 700 किलोमीटरचा प्रवास करून या यात्रेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. विधानसभा मतदारसंघात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. सर्वत्र दहशत निर्माण झाल्याने जनता सर्वच विकासात्मक पातळीवर फेल ठरणाऱ्या पालकमंत्र्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सुनील भैया गुट्टे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे बोलताना सुनील भैया गुट्टे म्हणाले की, शेतकरी संवाद यात्रेच्या निमित्ताने परळी विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई व परळी तालुक्यातील 160 गावांना जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधता आला.या संवादाच्या माध्यमातून मतदार संघातील बिकट प्रश्नांची जाणीव झाली. पैसे दिल्याशिवाय परळी तालुक्यात घरकुल मंजूर होत नाही. तसेच एकाच घरात तीन-तीन विहिरी मंजूर झाल्याचे हे लोकांनी सांगितले. सोयाबीनला 12 वर्षांपूर्वी चार हजार रुप
ये क्विंटल भाव होता तर आजही 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 4 हजार रुपयेच भाव मिळत आहे. 2019 मध्ये विद्यमान कृषी मंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लोकांना जाहीरनामाच्या माध्यमातून जे आश्वासने दिली होती त्यातील फक्त दहा टक्केच कामे झाल्याचेही गुट्टे यांनी सांगितले.
ये क्विंटल भाव होता तर आजही 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 4 हजार रुपयेच भाव मिळत आहे. 2019 मध्ये विद्यमान कृषी मंत्री आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लोकांना जाहीरनामाच्या माध्यमातून जे आश्वासने दिली होती त्यातील फक्त दहा टक्केच कामे झाल्याचेही गुट्टे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जेष्ठ नेत्या सौ. सुदामतीताई गुट्टे व शेतकरी नेते कालिदास आपेट यांच्या मार्गदर्शनाखाली, युवानेते सुनील भैया गुट्टे यांच्या नेतृत्वात परळी मतदारसंघातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचा सुसंवाद करण्यासाठी शेतकरी संवाद यात्रेचे मतदारसंघात दोन टप्प्यात आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी संवाद यात्रे दरम्यान पहिल्या टप्यानध्ये ९ दिवस ८८ गाद ४२३ किलोमीटर प्रवास तर दुसरा टप्पा ६ दिवस ६८ गाव ३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून या संवाद यात्रेने हजारो नागरिकांशी थेट संवाद साधला गेला. शेतकऱ्याच्या हक्काचि पिकविमा शेतकऱ्यांना अजूनही भेटला नाही, अतिदृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतक-याना अनुदान भेटले नाही, राज्य सरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कुठलाही आधार दिला नाही २५ टक्के अग्रीमची घोषणा करून आजतागत दोन महिने उलटुन गेले यामुळे शेतक-यांमध्ये खूप मोठा रोष दिसून येतो आहे. मतदारसंघात बहुतांश रस्त्याची खूप मोठी दुरावस्था दिसून येत आली. कुठल्याही गावाला पांदण रस्ते, शेत रस्ते झालेले नाहीत दळणवळण आणि विकासाच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी करणं गरजेचं होत अपेक्षित होत असं कुठलंही काम परळी मतदारसंघातील जनतेला दिसत नाही.
कृषिमंत्र्यांनी पाच वर्षांमध्ये किमान पाच गावांना पाच वेळा सुद्धा भेटी दिलेल्या नाहीत. शासनाच्या अनेक योजना ह्या सर्वसामान्य लोकांना मिळालेले नाहीत. ज्या लोकाचे मजबूत घर आहेत अश्याच लोकांना घरकुलाचि लाभ देण्यात आला आहे. सर्वसामान्य गरजवंत लोकांना ही योजना नाही प्रत्येक गावामध्ये एक ते दोन पुढारी नेमलेले आहेत त्या गावांमध्ये त्या योजनेचा लाभ कोणाला द्यायचा तेथील पुढारी ठरवतात. यामुळे त्यांच्या फक्त कार्यकर्ता आणि गाव पुढारी यांनाच योजना व च्या सुखसुविधाचा लाभ मिळतो.बाकी सर्व सामान्य लोकांना कुठलीही योजना परळी मतदारसंघात मागच्या पाच वर्षात मिळालेल्या नाहीत.
परळी शहरातील व्यापारी अस्वस्थ असून अनेक व्यापाऱ्यांच्या एजन्सी काढून घेतल्या अस अनेक व्यापा-यांनी सांगितले . मराठवाड्यात गाजलेली परळी बाजारपेठ पूर्णपणे मंदावली असून या बाजारपेठेत मोठी उलाढाल होत नसल्यामुळे सर्व व्यापारी हवालदिल आहेत. किरकोळ भुसारमाल विक्रेते, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते यांना माल विक्रीसाठी कायमस्वरूपी ठिकाण नाही. परळी शहरामध्ये महिलासाठी स्वच्छताग्रह नाहीत
परळी बस स्टॅन्डची तर भयानक मोठी दुरावस्था झाली असून यापूर्वी उद्घाटन केले आहे पण कुठेही काम झाले नाही. ही खूप गोठी दुर्दैवाची बाब आहे .कृषिमंत्र्यांनी फाईव्हस्टार एमआयडीसीच्या फक्त अनेक वेळा घोषण व बातम्या लावल्या, चर्चा केल्या पण प्रत्यक्षात कुठलंही काम केलेले दिसून येत नाही. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी सध्या असून मागच्या सहा सात वर्षापासून हा कारखाना बंद झाला आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रगती होणे अपेक्षित असताना उलट परळी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांच्या उत्पन्नात घट झाल्याचे सुनील गुट्टे यांनी सांगितले.
शेतकरी संवाद यात्रेच्या मार्गदर्शिका सौ.सुदामतीताई गुट्टे व शेतकरी नेते कालिदास दादा आपेट यांच्या नेतृत्वाखाली यात्रा संपन्न झाली असुन युवा नेते सुनील गुट्टे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, विधानसभा अध्यक्ष किरण काका पवार, तालुका सचिव ईश्वर सोनवणे, तालुका कार्याध्यक्ष रमेश ढाकणे, उपाध्यक्ष महारुद्र कदम, शहराध्यक्ष अॅड जीवनराव देशमुख, युवक शहराध्यक्ष सय्यद फिरोज, दतामाऊ शिंदे, जगन्नाथ आप्पा काकडे, कैलास लाकडे, मारुती भद्रे, जगमित्र पोळ, व्यंकटेश निर्म क, दिनेश तपसे, धनंजय जाधव, मुक्तार भाई, शिवाजीराव लोमटे, बब्रुवान आघाव, आदिनाथ कदम, मदनराव वानखेडे, रुस्तुम गाने, विशाल माने, ऋषिकेश शिंदे, सुदर्शन शिंदे, बाळासाहेब र सनर, सर्जेराव गडदे, नागनाथ शिंदे, विजयराव भोसले, हनुमंतराव सोळंके, श्रीकृष्ण जाधव, अगदराव बाकडे, राजकमल देशमुख, अगोल बावणे, उद्धवराव आधाव, सोमनाथराव भोसले, वृक्षराज काळे, राजेभाऊ काळे, बंडू काळे, गोपाळराव शिंगाडे, छत्रगुण नाना लांडगे, बळीराम गुट्टे, बाबासाहेब गव्हाणे, नंदू दोडके, नितीन हारे, प्रणित अटुळे यांसह अनेकांनी शेतकरी संवाद यात्रा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले.
टिप्पणी पोस्ट करा