परळी विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या वतीने रवी नेमाने प्रबळ दावेदार

परळी विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या वतीने रवी नेमाने प्रबळ दावेदार 

परळी प्रतिनिधी.   233  परळी विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवी नेमाने प्रबळ दावेदार आहेत .मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी संधी दिल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे रवी नेमाने यांनी एका प्रसिद्धी पत्रकार म्हटले आहे. 
    याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रवी नेमाने यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा परळी तालुक्याचा पहिला तालुका अध्यक्ष म्हणून मी काम केलेले आहे. परळी तालुक्यातील ग्रामीण भागात महाराष्ट्र निर्माण सेना पोहोचविण्यासाठी मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, जिल्हाध्यक्ष श्रीराम बादाडे,मनसेचे विद्यमान तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर, शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, मनसेचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव झीलमेवाड, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता दहिवाळ , मनसे विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष हनुमान सातपुते, शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे आदिंना सोबत घेऊन काम करीत आहेत.
    सध्या महाराष्ट्र नवनिर्मा
ण सेना वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून रवी नेमाने काम पाहत आहेत. बीड जिल्हा परिषद तसेच गोवर्धन हिवरा ग्रामपंचायतची निवडणूक त्यांनी लढवलेली त्यामुळे त्यांचा परळी विधानसभा मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सक्षम उमेदवार उभा राहू शकतो. परळी विधानसभा मतदारसंघातून संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी संधी दिल्यास आपण पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरू असेही नेमाने यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने