दोन दिवसांत इंडिया बँक व पोस्टाने महिलांचे केवायसी पूर्ण न केल्यास बँकेसमोर आंदोलन करणार - राजेभाऊ फड

दोन दिवसांत इंडिया बँक व पोस्टाने महिलांचे केवायसी पूर्ण न केल्यास बँकेसमोर आंदोलन करणार - राजेभाऊ फड 


परळी प्रतिनिधी.           मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया व परळी पोस्ट कार्यालयाने येणाऱ्या लाभार्थी महिलांचे केवायसी पूर्ण नाही केले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने बँके समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेभाऊ फड यांनी  दिला. ते आज केवायसी साठी जमा झालेल्या शेकडो महिलांशी बोलत होते. तसेच त्यांनी यावेळी इंडिया बँकेच्या मॅनेजरशीही  चर्चा केली. 
       मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचे पैसे बँकेतील महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. परंतु महिलांना केवायसी पूर्ण नसल्यामुळे पैसे काढता येत नाहीत. अशा हजारो महिला इंडिया बँकेच्या समोर पहाटेपासून जमा होत आहेत. कर्मचारी कमी असल्याने व नियोजन नसल्यामुळे   त्यांची केवायसी पूर्ण होत नसल्याने त्यांना दिवसभर बँकेपुढे ताटकळत बसावे लागत आहे. 
 ‌‌. अनेक महिलां सोबत लहान मुले सोबत असतात. तसेच वृद्ध महिला  या रांगेमध्ये दिवसभर उभ्या राहत आहेत. शिवाय इंडिया बँकेचा परिसर हा राणी लक्ष्मीबाई टावर जवळ असल्याने वाहनांची ही मोठी गर्दी असते. हा धोका लक्षात घेऊन राजेभाऊ फड यांनी आज स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा अधिकारी तिरपुडे व कार्य पोस्ट कार्यालय याच्या मॅनेजरशी चर्चा केली व येणाऱ्या सर्व महिलांचे केवायसी त्यादिवशी पूर्ण करून घ्यावे व महिलांना पैसे काढण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले. 
    जर येत्या दोन दिवसात बँकेने पोस्ट कार्यालयाने केवायसी पूर्ण करून घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा यावे राजाभाऊ फड यांनी दिला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने