कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल पंकजाताई मुंडे, प्रीतमताई मुंडे यांच्यासह लाडक्या बहिणींची उपस्थिती

कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता धनंजय मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पंकजाताई मुंडे, प्रीतमताई मुंडे यांच्यासह लाडक्या बहिणींची उपस्थिती 

परळी प्रतिनिधी.        कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता, गाजावाजा न करता महाराष्ट्राचे कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी आज दिनांक 24 ऑक्टोबर रोजी 233 परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आज आपला उमेदवारी अर्ज परळी उपविभागीय कार्यालयात दाखल केला. यावेळी भाजपा नेत्या आमदार पंकजाताई मुंडे व माजी खासदार डॉ.प्रीतम ताई मुंडे यांच्या सह लाडक्या बहिणींची प्रामुख्याने उपस्थित होत्या. 
     उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मी पंकजाताई मुंडे यांचा सुचक होतो. या वेळेला विधानसभा निवडणुकीत माझ्यासाठी पंकजाताई व डॉक्टर प्रीतम ताई उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत आहेत. माझा परळी विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेवर विश्वास असून जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे माझा विजय कोणीही रोखू शकत नाही. 
‌.    पुढे बोलताना ते म्हणाले की 2019 च्या निवडणुकीत तुम्ही जनतेला जाहीरनामाच्या माध्यमातून जे वचने व आश्वासने दिली होती ती सर्व आश्वासने पूर्ण केले आहेत परळी विधानसभा मतदारसंघाचा विकास करणे हेच माझे अंतिम ध्येय असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. उमेदवारी अर्ज दाखल करताना परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर तहसीलदार व्यंकटेश मुंडे उपस्थित होते.
    दरम्यान आपण उमेदवारी अर्ज अतिशय साध्या पद्धतीने भरणार असल्याचे जाहीर केल्यानंतर तहसील परिसर कार्यालयात धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने