अबब परळीत पिसाळलेल्या कुत्र्याने 29 जणांना घेतला चावा,नागरिकांत भितीचे वातावरण
परळी प्रतिनिधी. एकीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून दुसरीकडे मात्र आज परळी शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने चक्क 29 जणांना चावा घेतला आहे.कुत्रे चावलेल्या सर्वांनी परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील वैद्यनाथ मंदिर परिसरात आज दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळ पासून वृत लिही पर्यंत एका पिसाळलेल्या कुत्र्याने दिसेल त्याला चावा घेतल्याची घटना घडली आहे.चावा घेतलेल्या नागरिकांनी तातडीने परळी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन उपचार घेतल्याचे समजते.
दरम्यान या घटनेने परळी शहरात नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.परळी नगर परिषदेने व प्रशासनाने या पिसाळलेल्या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची गरज आहे.अन्यथा संख्या वाढू शकते.
टिप्पणी पोस्ट करा