आज सकाळी तेच कुत्रं आणखी एकाला चावलं
चावा घेतलेल्या नागरिकांची संख्या पोहचली 30 वर
परळी प्रतिनिधी. परळी कालपासून धुमाकूळ घातलेल्या पिसाळलेलं तेच कुत्र आज सकाळी मॉर्निंग साठी निघालेल्या आणखी एका परळीकरास चावले. आता पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिकांच्या संख्येत एक ने वाढ होऊन ती संख्या 30 वर पोहोचली आहे. दरम्यान पिसाळलेला कुत्र्याचा बंदोबस करण्यासाठी नगरपालिका कामाला लागली की नाही माहिती नाही परंतु नागरिक स्वतःच हातात काठ्या घेऊन कुत्र्याचा शो
ध घेताना दिसत होते.
ध घेताना दिसत होते.
. शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने काल दिवसभरात 29 जणांना चावा घेतला होता.कुत्रे चावलेल्या सर्वांनी परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून घेतले. आज सकाळी मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या प्रभाकर तुळशीराम कांबळे यांना कुत्र्याने चावा घेतला. त्यामुळे कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे काल दिवसभरापासून पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातलेला असताना अद्यापही नगरपालिका प्रशासन अथवा पोलीस प्रशासनाने कुत्र्याचा बंदोबस्त केलेला दिसत नाही त्यामुळे परळी शहरात या कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे.
👍👍👍
उत्तर द्याहटवाआणखी कोणाला चावल्यावर नगर पालिका ऍक्शन घेईल का. नसतात आणखी कोणाला चाऊ देईल
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा