१ नोव्हेंबरपासून राज्यातील ५५ हजार स्वस्त धान्य दुकानदार जाणार संपावर सर्वसामान्य, गोरगरिबांना ऐन दिवाळीत मिळणार नाही धान्य

 १ नोव्हेंबरपासून राज्यातील ५५ हजार स्वस्त धान्य दुकानदार जाणार संपावर


सर्वसामान्य, गोरगरिबांना ऐन दिवाळीत मिळणार नाही धान्य




परळी प्रतिनिधी.       राज्य सरकारच्या स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रती उदासीन धोरणामुळे आणि दिवाळीत राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार संपावर जाणार आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांनी दुकान बंद ठेवण्याचे हत्यार उपसल्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांना रेशनवर मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
     राज्य सरकारच्या अनासस्थेमुळे राज्यातील सात कोटी नागरिक राष्ट्रीय अन्न सुरक्षा लाभापासून वंचित राहणार आहेत. या संपात राज्यातील ५५ हजार रास्त भाव धान्य दुकानदार अँड दिवाळीपासूनच सहभागी होणार आहेत. कोणत्याही
मालाचे विक्री ते करणार नाहीत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार राज्य सरकारकडे मार्जिन मनी वाढीची मागणी अनेक वर्षांपासून करत आहेत. परंतु त्यांची ही मागणी अद्यापही प्रलंबित असल्याने अन्य न्याय हक्कांच्या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत धान्याचे विहरण होणार नाही, अशी भूमिका अखिल महाराष्ट्र रेशन दुकानदार महासंघ आणि ऑल महाराष्ट्र फेअर प्राइज शॉपकिपर फेडरेशनने घेतली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने