संत चोखामेळा ट्रस्ट च्या जागेतील अतिक्रमण हटवण्या संदर्भात बौद्ध समाजाची लवकरच व्यापक बैठक - मिलिंद घाडगे

संत चोखामेळा ट्रस्ट च्या जागेतील अतिक्रमण हटवण्या संदर्भात बौद्ध समाजाची लवकरच व्यापक बैठक - मिलिंद घाडगे 


परळी प्रतिनिधी.        परळी शहरातील संत चोखामेळा  ट्रस्टच्या जागेत अनेकांनी अतिक्रमण केले असून या जागेवरील अतिक्रमण हटवून त्या जागी भव्य स्मारक व सभागृह बांधण्याच्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी बौद्ध समाजाची लवकरच व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 
     याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, संत चोखामेळा हे वारकरी संप्रदायातील महान असे संत होते. वारकरी संप्रदायामध्ये संत चोखामेळा यांचे नाव आजही अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी आपल्या गाथा आणि साहित्यातून मानवी मूल्यांचे आणि समानतेचे पेरणी केलेली आहे. याबरोबर तत्कालीन जातीभेदावर प्रहार केलेला होता. वारकरी संप्रदाय हा तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्माचा  समतावादी विचा
र प्रवाह पुढे नेणारा संप्रदाय आहे. शहरातील भूमी अभिलेख कार्यालयात मालकी हक्काच्या जागे संदर्भात अशा प्रकारचे नोंदही आहे.
      चोखामेळा ट्रस्टचे पुनर्जीवन करणे तसेच अतिक्रमण काढून त्या जागेवर भव्य असे चोखामेळा यांचे स्मारक आणि सभागृह बांधून ते बहुजन समाजासाठी उपयोगात आणता येईल या उद्देशाने समाजाचे बैठक घेऊन त्यावर पुढे निर्णय घेण्यात येईल असेही मिलिंद घाडगे यांनी म्हटले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने