प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांना राज्यस्तरीय दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांना राज्यस्तरीय दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर  



परळी प्रतिनिधी.         प्रसिद्ध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक दिग्दर्शक डॉक्टर अनिल कुमार साळवे यांना नाशिक येथील कलावंत विचार मंच व मातोश्री उद्योग समूहाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला असून लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
    
    डॉ. अनिलकुमार साळवे यांनी सिने-नाटय क्षेत्रात दिलेल्या  अतुलनीय योगदानाबद्दल   सदरील पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात येत असल्याचे पुरस्कार सोहळ्याचे स्वागताध्यक्ष  तथा राष्ट्रीय लोकरत्न पुरस्कार सन्मा
नित  सामाजिक कार्यकर्ते सुनिल मोंढे यांनी कळविले आहे.नाटक व चित्रपट क्षेत्रातील सामाजिक व परिवर्तनवादी सांस्कृतिक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त लेखक-दिग्दर्शक डॉ.अनिलकुमार साळवे यांना  मान्यवरांच्या हस्ते सदरील पुरस्कार रविवार दि.  १३ ऑक्टोबर २०२४ रोजी  नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात प्रदान करण्यात येणार आहे.
    परिवर्तनवादी विचारधारेला समर्पित ,विद्यार्थी,शेतकरी,कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या सिने-नाट्यकृतींचा हा  सन्मान असल्याचे प्रतिपादन प्रख्यात दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांनी केले. मनोज कदम निर्मित तथा आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त व्यक्तिमत्त्व डॉ. अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित ग्लोबल आडगाव चित्रपट महाराष्ट्र   चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळतर्फे गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडण्यात आला होता.तसेच डॉ. अनिलकुमार साळवे यांना न्यू जर्सी अमेरिका यांचा बेस्ट रायटर अवॉर्ड,महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा रा. शं. दातार  नाट्यलेखन पुरस्कार, नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार आदी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. सदरील  सन्मान प्राप्त झाल्याबद्दल   विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रख्यात दिग्दर्शक डॉ. अनिलकुमार साळवे यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने