परळी बुलेटीनच्या दिवाळी विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन
परळी प्रतिनिधी.
बीड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या सायं.दैनिक परळी बुलेटिन च्या वतीने दिवाळी विशेषांक 2024 प्रकाशित करण्यात येणार आहे. या अंकासाठी साहित्यिकांनी आपले साहित्य पाठविण्याचे आवाहन संपादक रानबा गायकवाड यांनी केले आहे.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी परळी बुलेटीनचा दिवाळी विशेषांक प्रकाशित करण्यात येणार आहे. या अंकात अनेक मान्यवर साहित्यिकांचे साहित्य मुलाखती लेख, कथा आधी प्रकाशित करण्यात येणार आहेत. अतिशय दर्जेदार आणि वाचनीय असा दिवाळी अंक प्रकाशित
या अंकासाठी कवी, लेखक आदींनी आपल्या कथा, कविता, लेख, प्रवास वर्णन, व्यक्ती विशेष आदी साहित्य दिनांक 20 ऑक्टोबर पर्यंत परळी बुलेटीनच्या खालील मेल तसेच व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावे ही विनंती.सोबत आपला एक पासपोर्ट फोटो पाठवावा. Mail id: parlibulletin@gmail.com
WhatsApp number: 9420148538 साहित्यिकांनी वरील ई-मेल आयडी व व्हाट्सअप क्रमांक आपले साहित्य पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा