शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत पुरस्कार प्राप्त सिध्देश्वर इंगोले यांचा सत्कार संपन्न

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत पुरस्कार प्राप्त सिध्देश्वर इंगोले यांचा सत्कार संपन्न 


परळी प्रतिनिधी.     शहरातील शिवछत्रपती विद्यालयाचे शिक्षक सिद्धेश्वर इंगोले यांना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ स्पर्धेत द्वितीय पुरस्कार मिळाल्याबद्दल नुकताच त्यांचा रानबा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आयोजित राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडीओनिर्मिती स्पर्धा 2023 या वर्षात घेण्यात आले होते. या स्पर्धेत शहरातील शिवछत्रपती विद्यालयातील आदर्श शिक्षक सिद्धेश्वर इंगोले यांनी इयत्ता चौथीच्या मराठी पुस्तकातील ईदगाह या पाठावर आधारित बाहुल्यांचा सुंदर असा व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्यांच्या वेदना जाणून घेण्याची ताकद बालकांमध्ये निर्माण व्हावी हा उद्देश होता आणि तो या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सादर केला.
   त्यामुळे सिद्धेश्वर इंगोले यांना जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक व तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आला त्यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक भीमयुगकार रानबा गायकवाड तसेच प्रसिद्ध निवेदक व कवी बा सो. कांबळे युवा  पत्रकार विकास वाघमारे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने