परळीच्या पत्रकारितेतील चुकीचे पायंडे
परळीच्या पत्रकारितेत काही चुकीचे पायंडे पडत आहेत.जाहिरातीचे गुत्ते घेऊन ह्याला तेवढे द्या.त्याला तेवढे द्या असे होतांना दिसत आहे.ज्याला कुणाला लाखाची घ्यायची आहे त्यांनी लाखाची घ्यावी पण इतरांना एवढेच द्या तेवढेच द्या.याचं काय खरं,त्याचं काय खरं असे सांगत बसू नये. कुणाला किती येते आणि कुणाचं किती खर आहे हे प्रत्येकाला माहीत असते.असे सांगण्याचा प्रयत्न करू नये. त्यातल्या त्यात गुत्ते घेऊन स्वतःचा फायदा आणि इतरांचे नुकसान करू नये ही विनंती.
असेच अनेक पत्रकार परिषदेत एक गोष्ट दिसून येत आहे काल-परवा पत्रकारितेत आलेले पत्रकार पत्रकार परिषदेत समोर बसत आहेत. परंतु जेव्हा अनुभवी आणि ज्येष्ठ पत्रकार येतात तेव्हा त्यांना समोर बसायला जागा द्यावी अ
सा प्रघात आहे. आणि आमच्या सुरुवातीच्या पत्रकारितेच्या काळात जेव्हा पत्रकार परिषदा होत होत्या तेव्हा आमच्यापेक्षा जेष्ठ पत्रकार जेंव्हा नंतर येत होते तेव्हा त्यांना आम्ही आमची खुर्ची देऊन मागे बसत होतो.आणी त्यांना जागा देत होतो.हा एक प्रकारे त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या पत्रकारितेचा सन्मान होता आता. तसे आज होताना दिसत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
सा प्रघात आहे. आणि आमच्या सुरुवातीच्या पत्रकारितेच्या काळात जेव्हा पत्रकार परिषदा होत होत्या तेव्हा आमच्यापेक्षा जेष्ठ पत्रकार जेंव्हा नंतर येत होते तेव्हा त्यांना आम्ही आमची खुर्ची देऊन मागे बसत होतो.आणी त्यांना जागा देत होतो.हा एक प्रकारे त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या पत्रकारितेचा सन्मान होता आता. तसे आज होताना दिसत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
परळी शहर व तालुक्यातील जाहिराती देणारे नेते, कार्यकर्ते, संस्था, संघटना,पक्ष यांनी अशा जाहिरातीचे गुत घेणा-या पत्रकारांपासून सावधान राहण्याची गरज आहे.एखाद्या पत्रकाराला किती रुपयांची जाहिरात द्यायची किंवा किती सहकार्य करायचे हे तुम्ही ठरवा.अशा गुत्तेदार पत्रकारांमुळे अनेक पत्रकार नाराज होत आहेत.जे आपल्या पासून तोडण्याचा हा प्रयत्न तर करत नाहीत ना.अशामुळे आपल्यावर प्रेम करणारे पत्रकार दुरावू शकतात.
लावालाव्या आणि चुगली करणारे पत्रकार वाढले आहेत.कदाचित यात आमच्या सारख्या अनुभवी आणि निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या जातीवरही ते जात असतील असा संशय आता वाढत आहे.परळीच्या पत्रकारितेत अशाप्रकारे जातीमुळे कुणाला फायदा आणि कुणाचं नुकसान होत असेल तर ही गंभीर बाब आहे.तसे याचे चटके मी सोसले आहेत.
यापुढे असं गुत घेणा-या पत्रकार बांधवांना विनंती आहे वैयक्तिक रानबा गायकवाड यांना मी जाहिरात देतो असे म्हणून कोणीही मला जाहिरात मॅटर आणि रक्कम सांगू नये. माझे मी सदर जाहिरातदाराशी संपर्क साधून जाहीरात घेईन नाहीतर ती सोडून देईन.
आपला
रानबा गायकवाड
सद्यस्थितीत काही नेता निष्ठ पत्रकारच आपल्या नेत्यासाठी बातमीदारी करून सेवा बजावत आहेत, तर काही कार्यकर्ते पत्रकार म्हणून जाहिरात गुत्तेदारी ची लुडबुड करत आहेत.
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा