छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिल्यामुळे बाळासाहेब गरड यांना पोलीस निरीक्षक गोरख दहिफळे कडून अमानुष मारहाण
सिरसाळा पोलीस स्टेशनचे जातीयवादी पोलीस निरीक्षक गोरख दहिफळे यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ हकालपट्टी करा निवेदनाद्वारे मागणी
परळी प्रतिनिधी
सिरसाळा पोलीस स्टेशनचे वादग्रस्त जातीयवादी पोलीस निरीक्षक गोरख दहिफळे यांनी गणपती मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा दिल्यामुळे सामाजिक संभाजी ब्रिगेडचे परळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गरड यांना अमानुष मारहाण केली आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून या जातीयवादी पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी करण्यात आली आहे .
पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनामध्ये समाज बांधवांची मागणी अशी की मागच्या काही महिन्यांमध्ये सिरसाळ्याचे
वादग्रस्त पोलीस निरीक्षक यांनी अनेक तरुणांना धमकावने, मारहाण करणे असे प्रकार सातत्याने जाणीवपूर्वक केले आहेत .पूर्णपणे जातीय द्वेषातून या पोलिस निरीक्षकाचं वागणं व कार्यपद्धती असून अशा जातीयवादी पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल करून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे बीड येथे पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे.

यावेळी बीड जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.दोन दिवसात या जातीयवादी पोलीस निरीक्षकावर कारवाई नाही केली तर लोकशाही मार्गाने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या प्रसंगी पोलीस अधीक्षक यांना दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा