बोगस विहिर प्रकरणाचे खरे सुत्रधार कोण?
बोगस विहिर प्रकरणी जबाबदार दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी महिला कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
बीड प्रतिनिधी. परळी पंचायत समिती अंतर्गत बेलंबा येथील मयत पांडुरंग खंडू सरवदे यांच्या नावाने बोगस रोजगार हमी योजनेत विहीर पूर्ण केल्याचे दाखवून पैसे लाटणा-या मुख्य कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा व चुकीचे निलंबन रद्द करून पुन्हा सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी यांनी आपल्या कुटुंबासह बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. दरम्यान विभागीय आयुक्तांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश बीड जिल्हाधिकाऱ्यांना दिले
आहेत. दरम्यान या बोगस विहीर प्रकरणाचे खरे सूत्रधार कोण असा सवाल आता निर्माण होत असून बेलंबा येथील या प्रकरणामुळे तालुक्यात असे अनेक प्रकरणे घडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आहेत. दरम्यान या बोगस विहीर प्रकरणाचे खरे सूत्रधार कोण असा सवाल आता निर्माण होत असून बेलंबा येथील या प्रकरणामुळे तालुक्यात असे अनेक प्रकरणे घडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,अपर्णा अशोकराव पोलशेटवार या परळी पंचायत समिती येथे कंत्राटी पद्धतीने गेल्या सहा वर्षांपासून पीटीओ पदावर काम करीत आहेत.पंचायत समिती अंतर्गत बेलंबा येथील मयत शेतकरी पांडुरंग खंडू सरवदे यांच्या नावाने बोगस विहिर दाखवून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये उचलण्यात आले.ही माहिती सामाजिक कार्यकर्ते यांच्या लक्षात आल्यानंतर प्रकरण उजेडात आले.
याप्रकरणी अपर्णा पोलशेटवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.परंतू याप्रकरणी खरे सुत्रधार असलेले वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांना मात्र मोकळे सोडण्यात आले.त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.त्यामुळे त्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत व मला पुन्हा सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी अपर्णा पोलशेटवार या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या आहेत.
दरम्यान या प्रकरणी विभागीय आयुक्तांनी या उपोषणाची दखल घेतली असून जिल्हाधिकारी यांना चौखशीचे आदेश दिले आहेत.त्यामुळे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी गोत्यात येऊ शकतात.
टिप्पणी पोस्ट करा