ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते 22 सप्टेंबर रोजी परळीत हेल्थ केअर क्लिनिकचे उद्घाटन

ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते 22 सप्टेंबर रोजी परळीत हेल्थ केअर क्लिनिकचे उद्घाटन 


परळी प्रतिनिधी.       राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी शहरात   नव्याने सुरू होत असलेल्या हेल्थ केअर क्लिनिकचे 22 सप्टेंबर रोजी उद्घाटन होत असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए .तु . कराड व डॉ. विवेक एकनाथ कराड यांनी केले आहे.
‌.   शहरातील प्रेम प्रज्ञा नगर आयसीआयसीआय बँकेच्या शेजारी हेल्थ केअर क्लिनिक सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. तुकाराम महाराज शास्त्री हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वाल्मीक अण्णा कराड, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामंत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, भाजपा तालुकाध्यक्ष सतीश मुंडे व वैद्यनाथ बँकेचे माजी अध्यक्ष अशोक जैन, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीळकंठ चाटे, नवगण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉक्टर मधुकर आघाव, दिव्यांग महामंडळ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे, माजी उपनगराध्यक्ष आयुब खान पठाण ,युवा उद्योजक प्रा. पवनकुमार मुंडे, जि. प
. सदस्य प्रदीप मुंडे, भाजप नेते श्रीराम मुंडे, व वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेश गीते ,ज्येष्ठ नेते रामभाऊ कोपनर, जेष्ठ नेते जीवराज ढाकणे, ज्येष्ठ पत्रकार तथा साहित्यिक रानबा गायकवाड, ज्येष्ठ नेते भीमराव मुंडे आदी उपस्थित राहणार आहेत. 
     डॉ. विनय एकनाथ कराड यांनी नवी मुंबई येथे सुमारे दहा वर्ष उत्तम सेवा केलेली आहे. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक झाले होते .त्यांनी आता परळीकरांच्या सेवेसाठी हेल्थकेअर क्लिनिक सुरू केले आहे. 22 सप्टेंबर 2024 रोजी बारा वाजून 35 मिनिटांनी नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते या क्लिनकचे उद्घाटन संपन्न होईल. 
    या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए  .तु .कराड व डॉ.विवेक एकनाथ कराड यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने